advertisement

Lip Scrub : कोरड्या हवेत ओठांसाठी खास स्क्रब, जाणून घ्या कसा करायचा वापर

Last Updated:

हिवाळ्यात ओठ फुटण्याचं प्रमाण वाढतं, ओठांना भेगा पडतात. यावर घरगुती स्क्रब हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे ओठांवरची मृत त्वचा काढून टाकली जाते आणि ओठ मऊ, गुलाबी आणि हायड्रेटेड राहतात. पाहूयात, काही सोपे आणि उपयुक्त घरगुती स्क्रब घरी कसे बनवता येतील.

News18
News18
मुंबई : हिवाळ्याची कोरडी हवा, डिहायड्रेशन तसंच प्रदूषणामुळे ओठांमधली आर्द्रता कमी होते. ओलावा कमी झाल्यानं ओठ कोरडे होतात. हिवाळ्यात ओठ फुटण्याचं प्रमाण वाढतं, ओठांना भेगा पडतात. यावर घरगुती स्क्रब हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे ओठांवरची मृत त्वचा काढून टाकली जाते आणि ओठ मऊ, गुलाबी आणि हायड्रेटेड राहतात.
पाहूयात, काही सोपे आणि उपयुक्त घरगुती स्क्रब घरी कसे बनवता येतील. त्यातला पहिला आणि बनवायला स्क्रब आहे साखर आणि मधाचा स्क्रब. या स्क्रबसाठी, अर्धा चमचा मध एक चमचा ब्राऊन शुगरमधे मिसळा. ओठांवर एक-दोन मिनिटं हलक्या हातानं मसाज करा आणि कोमट पाण्यानं धुवा. साखरेमुळे मृत त्वचा काढली जाते आणि मधामुळे ओठ मॉइश्चरायझ होतात.
advertisement
कॉफी आणि ऑलिव्ह ऑइल स्क्रब - एक चमचा कॉफी पावडर आणि अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल मिसळून पेस्ट बनवा. ओठांवर गोलाकार हालचालीत घासून घ्या. कॉफीमुळे ओठ एक्सफोलिएट होतात, ऑलिव्ह ऑइलमुळे ओठांना पोषण मिळतं.
ओटमील आणि मिल्क स्क्रब - एक चमचा दळलेले ओटमील घ्या आणि त्यात थोडं कच्चं दूध घालून पेस्ट तयार करा. या स्क्रबमुळे ओठांंमधला ओलावा टिकून राहतो.
advertisement
गुलाबाची पाकळी आणि दूध स्क्रब - गुलाबाच्या पाकळ्या बारीक करा आणि त्यात काही थेंब दूध घाला. हे मिश्रण ओठांवर दोन मिनिटं घासल्यानं ओठ मऊ आणि थोडे गुलाबी होतील.
नारळ तेल आणि साखरेचा स्क्रब - अर्धा चमचा साखर आणि एक चमचा नारळ तेल मिसळा. ओठांवर हलक्या हातानं मालिश करा आणि नंतर पुसून टाका. नारळाच्या तेलानं ओलावा टिकून राहायला मदत होते आणि ओठ फाटण्याचं प्रमाण कमी होतं.
advertisement
कोरफड आणि ब्राऊन शुगर स्क्रब - कोरफडीच्या ताज्या गरात थोडी ब्राऊन शुगर मिसळा. या स्क्रबमुळे जळजळ आणि सूज कमी होते तसंच मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते.
लिंबू आणि मध स्क्रब - एक चमचा मधात काही थेंब लिंबाचा रस आणि अर्धा चमचा साखर मिसळा. या स्क्रबमुळे ओठांवरील मृत त्वचा काढून टाकली जाते आणि टॅनिंगही थोडं कमी होतं. आठवड्यातून फक्त दोन-तीन वेळाच स्क्रब करा; दररोज वापरल्यानं ओठ कोरडे होऊ शकतात.
advertisement
स्क्रबिंग केल्यानंतर नेहमी लिप बाम किंवा नारळाचं तेल लावा. भरपूर पाणी प्या आणि ओठांवरुन जीभ फिरवणं टाळा. या नैसर्गिक स्क्रब्सच्या वापरानं, काही दिवसांत ओठांचा कोरडेपणा, भेगा कमी होतात आणि ओठ मऊ, गुलाबी होतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Lip Scrub : कोरड्या हवेत ओठांसाठी खास स्क्रब, जाणून घ्या कसा करायचा वापर
Next Article
Gold Silver: 1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; दिग्गज एक्सपर्टने म्हणाला, मोठी उलथापालथ होणार
1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; मोठी उलथापालथ होणार
  • सोने खरेदीची घाई नको

  • अन्यथा होईल मोठे नुकसान

  • दिग्गज तज्ज्ञाचा खळबळजनक अंदाज

View All
advertisement