advertisement

Skin Care : त्वचेच्या समस्यांवर सोपं उत्तर, पेट्रोलियम जेलीचा योग्य वापर कसा करावा ? जाणून घेऊया तज्ज्ञांचं मत

Last Updated:

हिवाळ्यातल्या त्वचेशी संबंधित तक्रारींवर घरी एक उत्तर आहे. ते म्हणजे पेट्रोलियम जेली. पेट्रोलियम जेली दहा रुपयांना सहज उपलब्ध आहे आणि यात काही जिन्नस वापरुन त्वचेच्या अनेक समस्यांवर उत्तर मिळू शकतं.

News18
News18
मुंबई : हिवाळ्यातल्या थंड गार वाऱ्यांमुळे त्वचेतला ओलावा कमी होत जातो आणि त्वचा कोरडी होते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेच्या विविध समस्या जाणवतात.
हिवाळ्यातल्या त्वचेशी संबंधित तक्रारींवर घरी एक उत्तर आहे. ते म्हणजे पेट्रोलियम जेली. पेट्रोलियम जेली दहा रुपयांना सहज उपलब्ध आहे आणि यात काही जिन्नस वापरुन त्वचेच्या अनेक समस्यांवर उत्तर मिळू शकतं.
मुरुमांसाठी - व्हॅसलीनमधे कोरफडीचा गर मिसळा आणि मुरुमांवर लावा. एका रात्रीत तुम्हाला फरक दिसून येईल.
advertisement
पिगमेंटेशन - पिगमेंटेशन काढून टाकण्यासाठीही व्हॅसलीन उपयुक्त आहे. हळद व्हॅसलीनमधे मिसळा आणि त्वचेला लावा. हे नियमितपणे वापरल्यानं मदत होऊ शकते. कोपरांना आणि गुडघ्यांना देखील हे मिश्रण लावू शकता.
स्प्लिट एंड्ससाठी - स्प्लिट एंड्सचा त्रास होत असेल तर हा उपाय करून पहा. खोबरेल तेल व्हॅसलीनमधे मिसळा आणि केसांना लावा.
advertisement
मजबूत नखांसाठी - नखं सहज तुटत असतील तर व्हॅसलीन वापरून पाहा. व्हॅसलीनमधे तूप मिसळा आणि ते नखांना लावा. यामुळे नखे मजबूत होतात आणि नखं तुटण्याचं प्रमाण कमी होतं.
टाचांवरच्या भेगांसाठी - हिवाळ्यात भेगा पडतात. या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी, व्हॅसलीनमधे नारळाचं तेल आणि कोरफडीचा गर हे मिश्रण लावा. यामुळे काही दिवसांत भेगा पडलेल्या टाचा मऊ होतील.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : त्वचेच्या समस्यांवर सोपं उत्तर, पेट्रोलियम जेलीचा योग्य वापर कसा करावा ? जाणून घेऊया तज्ज्ञांचं मत
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement