Dry Fruits : हिवाळ्यात सुकामेवा खाण्याचे फायदे, तज्ज्ञांनी सांगितल्यात महत्त्वाच्या टिप्स
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आहाराव्यतिरिक्त तब्येतीच्या तंदुरुस्तीसाठी सुकामेवा हा आरोग्यासाठी एक सुपरफूड मानला जातो. आपल्या शरीराला आतून उबदार ठेवण्याची क्षमता सुक्या मेव्यात असते त्यामुळे हिवाळ्यात, सुका मेवा दररोज खाण्याची शिफारस केली जाते.
मुंबई : दिवसाच्या सुरुवातीला काही जण पोहे, उपमा अशी न्याहारी करतात. तर काही जण भिजवलेला सुका मेवा खातात. सकाळी रिकाम्या पोटी कोणता सुकामेवा खाणं सर्वात फायदेशीर आहे समजून घेऊयात.
आहाराव्यतिरिक्त तब्येतीच्या तंदुरुस्तीसाठी सुकामेवा हा आरोग्यासाठी एक सुपरफूड मानला जातो. आपल्या शरीराला आतून उबदार ठेवण्याची क्षमता सुक्या मेव्यात असते त्यामुळे हिवाळ्यात, सुका मेवा दररोज खाण्याची शिफारस केली जाते.
अंजीर - अंजीरात नैसर्गिक फायबर भरपूर प्रमाणात असतं. अंजीरा रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्यानं बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट स्वच्छ राहतं. यातून चांगल्या प्रमाणात लोह मिळतं, विशेषतः महिलांसाठी अंजीर महत्वाचं आहे. लोहामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढतं, ज्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणं आणि थकवा यासारख्या समस्या कमी होतात.
advertisement
मनुका - रात्रभर पाण्यात भिजवलेल्या काळ्या मनुका खाल्ल्याने शरीराला अँटीऑक्सिडंट्स मिळतात, ज्यामुळे त्वचेवरची चमक वाढते आणि सूज कमी होते. मनुकांमुळे हिमोग्लोबिन वाढतं, ज्यामुळे अशक्तपणा असलेल्यांसाठी मनुका फायदेशीर ठरतात. याशिवाय, काळ्या मनुकांमधे असलेलं नैसर्गिक ग्लुकोजमुळे सकाळी शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा मिळते आणि थकवा वाटत नाही.
बदाम - बदाम भिजवून खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. सालं काढून खाल्ल्यानं शरीराला त्यातील पोषक घटक अधिक प्रभावीपणे शोषण्यास मदत होते. बदामांमधे असलेल्या व्हिटॅमिन ईमुळे त्वचेला चमक येते. बदामातले घटक हार्मोन्स संतुलित करण्यासाठी आणि मूड स्थिर करण्यास मदत करतात. तसंच, दररोज सकाळी रिकाम्या पोटी बदाम नियमित खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते कारण यामुळे चयापचय सुधारतं.
advertisement
अक्रोड - अक्रोडात असलेले ओमेगा-3 फॅटी एसिड मेंदूच्या कार्यासाठी पोषक आहे, ज्यामुळे दिवसभर लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. यामुळे पोट फुगण्याचं प्रमाण कमी होतं. केस आणि त्वचेचं पोषण होतं आणि तणाव कमी करण्यासाठीही अक्रोड उपयुक्त आहे.
advertisement
शरीराच्या गरजेनुसार एक विशिष्ट ड्रायफ्रूट निवडू शकता किंवा आवडत असेल तर सर्व ड्रायफ्रूट एकत्र खाऊ शकता पण त्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 28, 2025 6:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dry Fruits : हिवाळ्यात सुकामेवा खाण्याचे फायदे, तज्ज्ञांनी सांगितल्यात महत्त्वाच्या टिप्स







