Low BP : कमी रक्तदाब कसा नियंत्रित करायचा ? रक्तदाब अचानक कमी झाला तर काय करावं ?

Last Updated:

रक्तदाब काही कारणांनी अचानक कमी झाला तर घाबरुन न जाता त्यावर उपचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला असा त्रास अचानक जाणवला तर घाबरू नका. रक्तदाब कमी झाला तर  काही पटकन होणारे उपाय लक्षात ठेवा. 

News18
News18
मुंबई : नेहमीसारखा दिवस सुरु असताना, कधीकधी डोळ्यांसमोर अंधारी येते, अचानक अशक्तपणा जाणवतो, चक्कर येते. अशी लक्षणं दिसत असतील तर ही बहुतेकदा कमी रक्तदाबाची लक्षणं असतात.
रक्तदाब काही कारणांनी अचानक कमी झाला तर घाबरुन न जाता त्यावर उपचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला असा त्रास अचानक जाणवला तर घाबरू नका. रक्तदाब कमी झाला तर  काही पटकन होणारे उपाय लक्षात ठेवा.
  • संबंधित व्यक्तीला लवकर जमिनीवर किंवा पलंगावर झोपा. यामुळे मेंदूला रक्तपुरवठा सुधारतो आणि चक्कर येण्याचं प्रमाण कमी होतं. शक्य असेल तर पाय थोडे वर करा. यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या मदतीनं हृदय आणि मेंदूमधे रक्त प्रवाह वाढतो.
  • साधं किंवा काळं अर्धा चमचा मीठ एक ग्लास पाण्यात विरघळवून लगेच प्या. मीठात सोडियम असतं, रक्तदाब वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरतं.
  • एक कप कडक कॉफी किंवा चहा प्यायल्यानंही त्वरित आराम मिळतो. कॅफिनमुळे रक्तदाब वेगानं वाढू शकतो. पण जास्त कॅफिन पिऊ नका.
  • घरी ओआरएस म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्सचं पॅकेट असेल तर ते पाण्यात विरघळवून लगेच प्या.
advertisement
यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरून निघतात. रक्तदाब सामान्य राखण्यासाठी हे आवश्यक असतं.
  • फळांचा रस किंवा ग्लुकोज प्यायल्यानं रक्तदाब सामान्य होण्यास मदत होते.
  • मीठ आणि साखरेच्या मिश्रणामुळे शरीराला आवश्यक ताकद मिळते.
  • वरती दिलेले उपाय घरगुती आणि त्वरीत करण्यासारखे आहेत. पण, रक्तदाब कमी होण्याचा त्रास वारंवार होत असेल किंवा हे उपाय करूनही चक्कर येत असेल, छातीत दुखत असेल किंवा खूप अशक्तपणा जाणवत असेल तर जास्त वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या. कमी रक्तदाब हे इतर गंभीर आजाराचे लक्षण असू शकतं, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका.
    view comments
    मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
    Low BP : कमी रक्तदाब कसा नियंत्रित करायचा ? रक्तदाब अचानक कमी झाला तर काय करावं ?
    Next Article
    advertisement
    Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
    कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
    • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

    • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

    • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

    View All
    advertisement