Interval Walking : रोज अर्धा तास Interval Walking करण्याचे फायदे, जाणून घ्या पद्धत
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
प्रकृती चांगली ठेवायची तर 10,000 पावलं चालण्याचा सल्ला दिला जातो. तर काही जण जपानी पद्धत असलेल्या Interval Walking ला महत्त्व देतात. किती पावलं चालता यापेक्षा कसं चालता हे जास्त महत्त्वाचं आहे. तीस मिनिटं Interval Walking करण्याचे फायदे समजून घेऊयात.
मुंबई : चांगलं आरोग्य, आहार आणि निरोगी जीवनशैलीसाठी कायम जपानी पद्धतीचं महत्त्व सांगितलं जातं. आरोग्याच्या दृष्टीनं जपानी पद्धतीनं चालण्याची एक विशेष पद्धत आहे. ही पद्धत आहे Interval Walking.
प्रकृती चांगली ठेवायची तर 10,000 पावलं चालण्याचा सल्ला दिला जातो. तर काही जण जपानी पद्धत असलेल्या Interval Walking ला महत्त्व देतात. किती पावलं चालता यापेक्षा कसं चालता हे जास्त महत्त्वाचं आहे. तीस मिनिटं Interval Walking करण्याचे फायदे समजून घेऊयात.
इंटरव्हल वॉकिंग ही चालण्याची जपानी पद्धत आहे. यात पावलं मोजण्यापेक्षा पद्धतीवर भर दिला जातो. नियमितपणे त्याचा सराव करायला सुरुवात केली तर आरोग्यात चांगले बदल होणं शक्य आहे.
advertisement
हृदयाचं आरोग्य सुधारतं - जलद चालण्यामुळे हृदय गती वाढते, हा मिनी-कार्डियो व्यायाम आहे. यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि रक्ताभिसरण सुधारतं.
चरबी जाळण्यास मदत होते - Interval Walking मुळे शरीराची कॅलरीज बर्न करण्याची क्षमता वाढते. यामुळे केवळ चालतानाच नव्हे तर नंतर देखील कॅलरीज बर्न करण्याची प्रक्रिया सुरू राहते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
advertisement
स्नायू मजबूत होतात - वेगानं चालण्यामुळे पायांच्या स्नायूंवर जास्त ताण येतो. मांडी, गुडघ्याच्या मागच्या स्नायूंना जोडणारे स्नायू आणि पोटरीचे असे पायांचे स्नायू यामुळे मजबूत होतात.
रक्तातील साखरेचं नियंत्रण: Interval Walking मुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत होते, यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यासाठी मदत होते.
सांध्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर: Interval Walking मुळे सांध्यावर अतिरिक्त दबाव पडत नाही, ज्यामुळे गुडघेदुखी किंवा दुखापत होण्याचा धोका कमी होतो. यामुळे हळूहळू सहनशक्ती देखील वाढते.
advertisement
कोणत्याही व्यायामाप्रमाणे, वॉर्मिंग अप करणं Interval Walking साठीही आवश्यक आहे. सुरुवातीला थोडं स्ट्रेचिंग, गुडघे वाकवणं आणि 5-10 मिनिटं खूप हळू चालण्यापासून सुरुवात करा. यामुळे स्नायू सक्रिय होतील आणि दुखापतीचा धोका कमी होईल.
तीन मिनिटं वेगानं चालणं - एखाद्या ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी जितकी लगबग असते तशी लगबग या चालण्यात हवी. यावेळी हृदयाचे ठोके वाढले पाहिजेत.
advertisement
तीन मिनिटं हळू चालणं - आता हळू चाला आणि आरामात चाला. या काळात श्वासोच्छ्वास आणि हृदय गती सामान्य होण्यास सुरुवात होईल. वेगानं आणि मंद चालण्याचा क्रम वीस ते तीस मिनिटं करा.
कूल डाऊन - चालणं झाल्यानंतर अचानक थांबू नका. पाच मिनिटं अतिशय मंद गतीनं चाला. त्यानंतर, शरीराचं तापमान आणि हृदय गती सामान्य होण्यास मदत करण्यासाठी आणि स्नायू कडक होण्यास प्रतिबंध करण्यासाठी काही हलके स्ट्रेचिंग व्यायाम करा.
advertisement
तब्येतीच्या कोणत्याही तक्रारी असतील तर कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 7:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Interval Walking : रोज अर्धा तास Interval Walking करण्याचे फायदे, जाणून घ्या पद्धत


