कमी बजेट असणाऱ्यांसाठी हे आहेत 5 सर्वात स्वस्त 5G फोन्स! कॅमेराही भारी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
5G स्मार्टफोन खरेदी करणे आता महाग राहिलेले नाही. तुम्हाला सुपरफास्ट इंटरनेटचा आनंद घ्यायचा असेल पण बजेटची काळजी वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला पाच स्वस्त 5जी मोबाईल फोनबद्दल माहिती देऊ. या यादीत POCO, MOTOROLA, Samsung, Ai+ आणि Redmi सारखे ब्रँड समाविष्ट आहेत.
5G Mobile फोन खरेदी करणे आता महागडे राहिलेले नाही. अनेक कंपन्या कमी बजेटमध्येही 5G Smartphones विकत आहेत. तुम्हाला सुपरफास्ट इंटरनेटचा आनंद घ्यायचा असेल पण 5G फोन खरेदी करण्यासाठी खूप मोठे बजेट लागते असे वाटत असेल, तर तसे नाही. आज आम्ही तुम्हाला 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या पाच स्वस्त 5जी स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Ai+ Nova 5G : 5जी सपोर्ट असलेला हा परवडणारा 5जी फोन फ्लिपकार्टवर 8999 रुपयांना विकला जात आहे. या किंमतीत 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजचा समावेश आहे. 5जी व्यतिरिक्त, या हँडसेटमध्ये 50-मेगापिक्सेल एआय ड्युअल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा, 6.7-इंच एचडी+ डिस्प्ले आणि युनिसॉक टी8200 प्रोसेसर देखील आहे.
advertisement
REDMI 14C 5G : या रेडमी स्मार्टफोनचा 4 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 9845 रुपयांना विकला जात आहे. फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेला हा फोन 6.8-इंच एचडी+ डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 4 जेनरेशन 2 प्रोसेसर, 5160 एमएएच बॅटरी, 8-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा, 50-मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा आणि 18 वॅट फास्ट चार्जिंग सारख्या फीचर्ससह येतो.


