Mahindra ने आणली सुपरफास्ट Car, एका चार्जमध्ये मुंबई-पुणे 4 वेळा बिनधास्त फिरा,लूक पाहून पडाल प्रेमात
- Published by:Sachin S
Last Updated:
. अलीकडे महिंद्राने BE सीरिजमध्ये हायटेक आणि सुपरफास्ट अशा इलेक्ट्रिक कार लाँच केल्या होत्या. आता महिंद्राने आपल्या इलेक्ट्रिक SUV-कूप, BE 6 चं BE 6 Formula E Edition मॉडेल लाँच केलं आहे.
भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने आतापर्यंत मार्केटमध्ये ईलेक्ट्रिक कार लाँच करून जोरदार आघाडी घेतली आहे. अलीकडे महिंद्राने BE सीरिजमध्ये हायटेक आणि सुपरफास्ट अशा इलेक्ट्रिक कार लाँच केल्या होत्या. आता महिंद्राने आपल्या इलेक्ट्रिक SUV-कूप, BE 6 चं BE 6 Formula E Edition मॉडेल लाँच केलं आहे. कंपनीने याआधी BE 6 आणि XEV 9e च्या 30,000 गाड्यांची विक्री केली. त्यानंतर Mahindra BE 6 Formula E Edition आणली आहेय विशेष म्हणजे, या कारची रेंजही सर्वाधिक आहे.
advertisement
advertisement
Mahindra BE 6 Formula E Edition च्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर ही एक पूर्ण स्पोर्टी लूक देते. आधीच्या कारपेक्षा थोडेफार बदल करण्यात आले आहे. समोर गोल LED प्रोजेक्टर हेडलॅम्प दिला आहे, बनावट आणि चांदीच्या बॅश प्लेटसह सुधारित फ्रंट आणि रीअर बंपर आहेत. यात नवीन एरो डिझाइनसह तब्बल 20-इंचाचे अलॉय व्हील्स देखील आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Mahindra BE 6 Formula E Edition बॅटरी आणि रेंज - बॅटरी आणि रेंजबद्दल बोलायचं झालं तर BE6 स्पेशल एडिशनमध्ये 79kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे, जो मागील-एक्सल माउंटेड इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेला आहे. हा सेटअप २८६ बीएचपी पॉवर आणि ३८० एनएम इतका टॉर्क जनरेट करतो. कंपनीने दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यावर ही कार 682 किमीची रेंज देईल.
advertisement
advertisement
advertisement
Mahindra ने आपल्या या BE 6 Formula E Edition साठी पहिल्या ९९९ ग्राहकांसााठी स्पेशल ऑफर दिली आहे. याामध्ये महिंद्रा ची फॉर्मुला E कारवर नाव नोंदवण्याची संधी, महिंद्रा रेसिंग कलेक्टरचा बॉक्स आणि Alpine Formula-1 रिजर्व ड्रायव्हर कुश मॅनीसोबत एकदा ट्रॅकवर अनुभव घेण्याची संधी आहे. ३ नशिबवान विजेत्यांना 2026 मध्ये लंडन होणाऱ्या ई-प्रीमध्ये सहभागी होता येईल.
advertisement
advertisement


