Rohit Sharma : मुंबईच्या रोहितची 'बिहारी स्टाईल', हाय सिक्युरीटी असलेल्या एअरपोर्टवर काय केलं, सगळे प्रवासी अवाक झाले, VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रोहित शर्मा आज रांचीत दाखल झाला आहे.दरम्यान रांचीच्या एअरपोर्टवर पोहोचताना त्याच्यासोबत एक मजेशीर किस्सा घटना आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
Rohit sharma viral Video : साऊथ आफ्रिकेविरूद्ध टेस्ट मालिकेत दारून पराभव झाल्यानंतर आता टीम इंडिया 30 नोव्हेंबर 2025 पासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत. या मालिकेतला पहिला सामना हा रांचीच्या जेएससीएच्या इंटरनेशनल स्टेडिअममध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्मा आज रांचीत दाखल झाला आहे.दरम्यान रांचीच्या एअरपोर्टवर पोहोचताना त्याच्यासोबत एक मजेशीर किस्सा घटना आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
खरं तर साऊथ आफ्रिकेविरूद्ध पहिल्या वनडे सामन्याआधी रोहित शर्मा आज रांचीच्या एअरपोर्टवर दाखल झाला होता.एअरपोर्टवर पोहोचताच त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आल. विशेष म्हणजे त्याचं स्वागत करायला भारताचा माजी क्रिकेटर आणि झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनचा जॉईंट सेक्रेटरी शाहबाद नदीम त्याला घ्यायला एअरपोर्टवर आला होता.
Rohit Sharma to Shahbaz Nadeem at Ranchi airport when he comes to receive him : "Are bhai ye to hamara dost hai, ye to hamara dekhbhal Kara hai"
Rohit Sharma what a character
pic.twitter.com/GFeAz22sOR
— पुल शॉट (@Pullshot66) November 27, 2025
advertisement
रोहित शर्माला एअरपोर्टवर घ्यायला कोण येणार आहे?याची काहीच कल्पना नव्हती.पण ज्यावेळेस तो शाहबाज नदीमला पाहता त्यावेळी तो प्रचंड खुश होता आणि बिहारी स्टाईलमध्ये म्हणतो,अरे हा तर माझा मित्र आहे, आणि हाच माझी काळजी घेतोय('अररे भाई, इ तो हमारा दोस्त है, ये तो हमारा देखभाल कर रहा है!'). रोहित असे म्हणताच एअरपोर्टवर एकच हास्यकल्लोळ होतो. विशेष म्हणजे रोहित शर्माच हे वाक्य ऐकूण त्यांच्यातली मैत्री किती चांगली आहे, हे दर्शवते आहे. रोहित शर्माचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
advertisement
रोहित पुन्हा बनला वनडेचा बादशाह
रोहित शर्मा गूडन्यूज घेऊन आला होता.रोहित शर्मा पुन्हा एकदा जगातला नंबरचा फलंदाज बनला आहे. कारण रोहित शर्माने आयसीसीच्या वनडे बॅटींग रॅकींगमध्ये पुन्हा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली होती.गेल्या बुधवारी न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेरी मिचेल याने रोहित शर्माला मागे टाकलं होतं. डेरी मिचेलने 782 गुणांसह अव्वल स्थान गाठलं होतं. डेरी मिचेलने वेस्ट इंडिजविरूद्ध 119 धावांची शतकीय खेळी केली होती. या शतकीय खेळीच्या बळावर त्याने 36 गुण मिळवून 782 गुणांसह रोहित शर्माची वनडे फलंदाजी क्रमावारीतली बादशाहात संपवली होती.
advertisement
पण आता आठवड्याभरानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा वनडेचा बादशाह बनला आहे.कारण त्याने पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठलं आहे. रोहित शर्मा आता 781 गुणांसह वनडे बॅटींग रॅकींगमध्ये अव्वल स्थानी आहे. तर डेरी मिचेल 766 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. रोहित व्यतिरीक्त टॉप 5 मध्ये शुभमन गिल 745 गुणांसह आणि चौथ्या तर विराट कोहली 725 गुणांसह पाचव्या स्थानी आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 7:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : मुंबईच्या रोहितची 'बिहारी स्टाईल', हाय सिक्युरीटी असलेल्या एअरपोर्टवर काय केलं, सगळे प्रवासी अवाक झाले, VIDEO


