Pune News: बुधवार पेठेत खळबळ, तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

Last Updated:

मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

News18
News18
अभिजीत पोते,प्रतिनिधी
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील बुधवार पेठ परिसरात एका तरुणीने राहत्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना  गजबजलेल्या बुधवार पेठ परिसरात घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर तरुणी ही या इमारतीत वास्तव्यास होती. सायंकाळच्या सुमारास तिने अचानक नवव्या मजल्यावरून खाली उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर  पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
advertisement

आत्महत्येचं कारण अद्याप समोर नाही

तरुणीच्या घरातील कुटुंबीयांची चौकशी सुरू असून, शेजाऱ्यांचे जबाबही नोंदवले जात आहेत. प्राथमिक तपासात कोणतीही चिठ्ठी किंवा सुसाईड नोट आढळून आलेली नाही. त्यामुळे ही आत्महत्या कोणत्या कारणामुळे झाली, याबाबत संभ्रम आहे. मानसिक तणाव, कौटुंबिक वाद किंवा इतर काही कारण होते का, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.
advertisement

घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी

घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. गोंधळाचे वातावरण निर्माण झाले मात्र  पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान  या घटनेचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत असून सविस्तर माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: बुधवार पेठेत खळबळ, तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement