Obesity : शरीर देत असलेल्या संकेतांकडे लक्ष द्या, लठ्ठपणामुळे होईल शरीराचं मोठं नुकसान
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
शरीराचं वजन एकदम वाढत नाही, वजन वाढत असल्याचे आणि शरीरावर त्याचा ताण येत असल्याचे शरीर संकेत देत असतं. ही लक्षणं वेळीच ओळखून योग्य ते बदल करणं प्रकृतीसाठी महत्त्वाचं आहे. लठ्ठपणाची सुरुवातीची लक्षणं समजली तर लठ्ठपणा वाढण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे.
मुंबई : लठ्ठपणा म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. लठ्ठपणामुळे विविध अवयवांवर दबाव येतो, ज्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
शरीराचं वजन एकदम वाढत नाही, वजन वाढत असल्याचे आणि शरीरावर त्याचा ताण येत असल्याचे शरीर संकेत देत असतं. ही लक्षणं वेळीच ओळखून योग्य ते बदल करणं प्रकृतीसाठी महत्त्वाचं आहे. लठ्ठपणाची सुरुवातीची लक्षणं समजली तर लठ्ठपणा वाढण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे.
advertisement
पोट आणि कंबरेवर चरबी साठणं - विशेषतः पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होणं हे लठ्ठपणाचं लक्षण आहे. पण हीच चरबी हळूहळू अनेक रोगांचे मूळ कारण ठरतं.
श्वास घेण्यास त्रास होणं - पायऱ्या चढताना किंवा थोडं चालताना श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हे वजनामुळे शरीरावर दबाव येत असल्याचे संकेत आहेत. हृदय आणि फुफ्फुसांसाठी हे धोक्याचे संकेत आहेत.
advertisement
लवकर थकवा येणं - श्रम न करताही थकवा जाणवत असेल, तर हे चयापचय कमकुवत झाल्याचं आणि वाढत्या लठ्ठपणाचं लक्षण असू शकतं. याकडे दुर्लक्ष करू नये.
वारंवार भूक लागणं - सतत खूप भूक लागली असेल आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर ते वजन वाढत असल्याचं लक्षण आहे.
झोपेचा अभाव किंवा घोरणं - झोपेत जास्त घोरत असाल तर हे देखील लठ्ठपणाचं एक लक्षण आहे. लठ्ठपणामुळे घसा आणि मानेमधे चरबी जमा होते, ज्यामुळे घोरणे आणि स्लीप एपनियाचा धोका वाढतो.
advertisement
गुडघे आणि पाठदुखी - लठ्ठपणा हा सांध्यांसाठी वाईट आहे. शरीराच्या अतिरिक्त वजनामुळे हाडं आणि सांध्यांवर दबाव येतो, ज्यामुळे गुडघे आणि पाठदुखी होते.
जास्त घाम येणं - कमी हालचाली करूनही जास्त घाम येणं हे लठ्ठपणाचं एक गंभीर लक्षण आहे.
advertisement
मूड स्विंग्स आणि चिडचिडेपणा - हार्मोनल बदल आणि इन्सुलिन असंतुलनामुळे विनाकारण चिडचिड होऊ शकते.
हृदयाचे ठोके वाढणं - वजन वाढल्यानं हृदय अधिक काम करते, ज्यामुळे हृदयाचे ठोके जलद होऊ शकतात. हे देखील लठ्ठपणाचे एक प्रमुख लक्षण आहे.
लठ्ठपणा अचानक जाणवत नाही. हे सूक्ष्म बदल लवकर ओळखले तर नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि चांगली झोप यासारखे साधे बदल वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 8:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Obesity : शरीर देत असलेल्या संकेतांकडे लक्ष द्या, लठ्ठपणामुळे होईल शरीराचं मोठं नुकसान


