advertisement

कॅन्सरने मुलगा गेला, विजय बनले अनाथांचे नाथ; 150 मुलांना घडवलं, 19 मुलींचं लावलं लग्न, प्रवास सुरूच!

Last Updated:

निसर्गाच्या सान्निध्यात असलेली आपलं घर संस्था गेल्या 25 वर्षांपासून अनाथ मुलांचा आणि निराधार पालकांचा सांभाळ करत आहे. या संस्थेमधून 150 पेक्षा अधिक मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत.

+
कॅन्सरने

कॅन्सरने मुलगा गेला... पण विजय फळणीकर बनले शेकडो अनाथ मुलांचे आई-वडील

पुणे: शेकडो अनाथ मुलांच्या आणि निराधार वृद्धांच्या डोक्यावर मायेचं छत्र उभे करणारे आणि एका परिवाराप्रमाणे त्यांचा सांभाळ करणारी संस्था म्हणजे आपलं घर. पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे येथे आपलं घर ही संस्था आहे. या संस्थेची स्थापना विजय फळणीकर यांनी 2001 साली केली. संस्थेमध्ये अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात असलेली आपलं घर संस्था गेल्या 25 वर्षांपासून अनाथ मुलांचा आणि निराधार पालकांचा सांभाळ करत आहे. या संस्थेमधून 150 पेक्षा अधिक मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. काही मुली लंडनमध्ये स्थायिक झाल्या आहेत. अनेक मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत. या संस्थेविषयी विजय फळणीकर यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
विजय फळणीकर यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा वैभव याचे 2001 साली कॅन्सरने निधन झाले. त्यानंतर आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी आपलं घर संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. स्वतः विजय फळणीकर यांचेही बालपण अनाथाश्रमात गेलं होतं. त्यामुळे एका मुलाला दत्तक घेण्याऐवजी अनेक मुलांचे आई-वडील बनण्याचा विचार त्यांनी केला आणि त्यातून या संस्थेचा जन्म झाला.
advertisement
आपलं घरमधून आजपर्यंत 150 पेक्षा जास्त मुलं बाहेर पडली आहेत, तर 19 मुलींची लग्नं संस्थेच्या मदतीने झाली आहेत. कोणतीही सरकारी मदत न घेता, फक्त समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने ही संस्था गेली 25 वर्षे अविरतपणे चालू आहे. आपलं घरमध्ये फक्त अनाथ मुलांसाठी आश्रम नाही, तर वृद्धांसाठी वृद्धाश्रमही आहे. अनाथ मुलांना आजी-आजोबांचं प्रेम मिळावं आणि वृद्धांना नातवांचं प्रेम मिळावं, यासाठी अनाथाश्रम सुरू केल्यानंतर विजय फडणीकर यांनी वृद्धाश्रमही सुरू केलं.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
कॅन्सरने मुलगा गेला, विजय बनले अनाथांचे नाथ; 150 मुलांना घडवलं, 19 मुलींचं लावलं लग्न, प्रवास सुरूच!
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement