Success Story : दीड एकरात 700 झाडांची लागवड, शेतकऱ्याने केली यशस्वी सीताफळ शेती, वर्षाला लाखोंची कमाई

Last Updated:

शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. शेतकरी दत्तात्रय दळवी यांनी असाच एक प्रयोग केला आहे.

+
दोन

दोन वर्षांपूर्वी केली सीताफळची लागवड, खर्च वजा करून उत्पन्न घेतला लाखात

सोलापूर : शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील येवली गावात राहणारे शेतकरी दत्तात्रय दळवी यांनी असाच एक प्रयोग केला आहे. दोन वर्षांपूर्वी दत्तात्रय यांनी दीड एकरात NMK गोल्ड या जातीच्या सीताफळाची लागवड केली आहे. या लागवडीसाठी त्यांना एक ते दोन लाख रुपयांचा खर्च आला आहे. तर दोन वर्षांत त्यांनी सीताफळ विक्रीतून खर्च वजा करून 6 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्या संदर्भात अधिक माहिती दत्तात्रय दळवी यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
येवली गावात राहणारे शेतकरी दत्तात्रय दळवी यांनी दीड एकरात NMK गोल्ड या जातीच्या सीताफळाची लागवड केली आहे. दीड एकरामध्ये जवळ 700 पेक्षा अधिक सीताफळाच्या झाडांच्या रोपांची लागवड केली आहे. सीताफळाच्या झाडावर कोणताही रोग नाही म्हणून दत्तात्रय दळवी यांनी वेळोवेळी रोपांवर फवारणी केली.
advertisement
या NMK गोल्ड झाडांना एकदा सीताफळाची लागवड सुरू झाल्यास त्याची तोडणी दोन ते तीन महिने चालते. तर सध्या सीताफळाला बाजारात 25 रुपये ते 30 किलो दराने मागणी आहे. मागील वर्षी सीताफळाला 80 ते 90 रुपये किलो दर मिळाला होता. यातून लागवडीचा खर्च वजा करून तीन लाख रुपयांचा नफा दत्तात्रय दळवी यांना मिळाला होता. यावर्षी सुद्धा सीताफळाला मागणी असून आतापर्यंत सीताफळ विक्रीतून दळवी यांना 1 लाख रुपये मिळाले आहेत.
advertisement
दत्तात्रय दळवी हे सीताफळाची विक्री सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे, मुंबई येथील मार्केटला विक्री करत आहेत. तर काही व्यापारी दत्तात्रय दळवी यांच्या शेतातून सीताफळाची पाहणी करून जाग्यावरून 30 रुपये ते 35 रुपये किलो या दराने खरेदी करत आहेत. तर दोन वर्षांत सीताफळ विक्रीतून शेतकरी दत्तात्रय दळवी यांनी लागवडीचा खर्च वजा करून 4 लाखांचा नफा मिळवला आहे. सध्या सीताफळाची तोडणी सुरू असून अजून एक ते दोन महिन्यात सीताफळ विक्रीतून जवळपास 1 लाख रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडे लक्ष न देता फलोत्पादन शेतीकडे वळावे, असा सल्ला शेतकरी दत्तात्रय दळवी यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : दीड एकरात 700 झाडांची लागवड, शेतकऱ्याने केली यशस्वी सीताफळ शेती, वर्षाला लाखोंची कमाई
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement