Friday Market Action: गुरुवार रात्रीच्या घोषणांनी वाढली उत्सुकता, 12 कंपन्यांच्या Shareची यादी फुटली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market Prediction: शुक्रवारच्या सत्रात 12 मोठ्या कंपन्यांच्या महत्त्वपूर्ण घोषणांमुळे त्यांच्या स्टॉक्समध्ये जोरदार हालचाल दिसू शकते. अधिग्रहण, भागीदारी, टॅक्स अपडेट आणि रेग्युलेटरी अॅक्शनमुळे गुंतवणूकदार या शेअर्सकडे बारकाईने पाहणार आहेत.
मुंबई: शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात 12 कंपन्यांचे स्टॉक्स गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सच्या खास रडारवर राहणार आहेत. या कंपन्यांनी अधिग्रहण, भागीदारी, व्यवसाय विस्तार, टॅक्स अपडेट आणि रेग्युलेटरी अॅक्शनसारख्या मोठ्या घडामोडी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या शेअर्समध्ये मोठी हालचाल दिसण्याची शक्यता आहे कोणते स्टॉक्स आज सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहेत ते जाणून घ्या...
advertisement
Wipro
IT क्षेत्रातील दिग्गज विप्रो लिमिटेड ने Odido Netherlands B.V. सोबत बहुवर्षीय कराराची घोषणा केली आहे. या भागीदारीचा उद्देश कंपनीचे IT लँडस्केप आधुनिक करणे आणि एंटरप्राइज तसेच कन्झ्युमर सेगमेंटमध्ये ग्राहक अनुभव अधिक सुलभ आणि प्रभावी बनवणे हा आहे.
advertisement
Bajaj Healthcare
Bajaj Healthcare Ltd ने फार्मा क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ श्रीकुमार शंकरणारायण नायर यांची तत्काळ प्रभावाने मुख्य ऑपरेटिंग अधिकारी (COO) म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 27 नोव्हेंबर रोजी सर्क्युलर रिझोल्यूशनद्वारे ही नियुक्ती मंजूर केली. ही नियुक्ती नॉमिनेशन आणि रेम्युनरेशन कमिटीच्या शिफारसीवर आधारित होती.
advertisement
Adani Enterprises
अदाणी एंटरप्राइजेसच्या सहाय्यक कंपनी Adani Defence Systems & Technologies Ltd (ADSTL) ने Flight Simulation Technique Centre Pvt Ltd (FSTC) मधील 72.8% हिस्सेदारी खरेदी करण्याचा करार केला आहे. ही हिस्सेदारी ADSTL आणि Prime Aero Services LLP मिळून खरेदी करतील. FSTC हा भारतातील सर्वात मोठा स्वतंत्र फ्लाइट ट्रेनिंग आणि सिम्युलेशन सेवा पुरवठादार आहे. या डीलचे एंटरप्राइज व्हॅल्यू 820 कोटी निश्चित केले आहे.
advertisement
Reliance Industries Ltd
रिलायन्स इंडस्ट्रीज, ब्रुकफील्ड आणि डिजिटल रिअल्टी यांच्या Digital Connexion या संयुक्त प्रकल्पाने 2030 पर्यंत 11 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचे करार केले आहे. कंपनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथे 400 एकर परिसरात 1-गिगावॅट AI-नेटीव डेटा सेंटर कॅम्पस उभारणार आहे.
advertisement
Medanta
मेदांता ने नोएडामध्ये आपले नवीन 550-बेडचे सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल औपचारिकरित्या लाँच केले आहे. यामुळे कंपनीची NCR आणि उत्तर प्रदेशातील उपस्थिती अधिक मजबूत झाली आहे. या अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटन 27 नोव्हेंबर 2025 रोजी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
advertisement
Orient Electric
ओरिएंट इलेक्ट्रिक ने जाहीर केले की त्यांना टॅक्स विभागाकडून सुधारित आदेश प्राप्त झाला आहे. याअन्वये आधी निश्चित केलेली 51.6 कोटींची टॅक्स मागणी घटवून फक्त 31,904 इतकी करण्यात आली आहे. गुरुवारी कंपनीचा शेअर 2.61% घसरून 185 वर बंद झाला.
Tata Technologies
टाटा टेक्नोलॉजीज ने ES-Tec GmbH च्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण केल्याची घोषणा केली. सर्व क्लोजिंग कंडीशन्स पूर्ण झाल्यानंतर कंपनीची सिंगापूर स्थित सहाय्यक कंपनी Tata Technologies Pte. Ltd. ने ES-Tec Groupमधील सर्व कंपन्यांचे 100% शेअर्स खरेदी केले.
Tata Elxsi
Tata Elxsi ने आयर्लंडच्या Druid Software सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. या सहकार्याद्वारे कंपनी आपल्या एंटरप्राइज 5G ऑफरिंगला इंटिग्रेटेड प्रायव्हेट नेटवर्क सोल्यूशन्सच्या मदतीने अधिक बळकटी देणार आहे. ही भागीदारी कंपनीच्या xG-Force Lab-as-a-Service प्लॅटफॉर्मवर राबवली जाईल.
Emcure Pharmaceuticals
एमक्योर फार्मास्युटिकल्स ने सांगितले की GST विभागाने त्यांच्या मुंबईतील कार्यालयांवर सर्च आणि तपासणी मोहीम राबवली. ही कारवाई 24 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12:15 वाजता सुरू झाली आणि 26 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता संपली.
Bombay Dyeing
कंपनीने जाहीर केले की तिचा पाताळगंगा प्लांट हा 28 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत मेंटेनन्स शटडाऊनवर राहील. या काळात कंपनीचे जवळपास 7,500 मेट्रिक टन उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
Zydus Lifesciences
जायडस लाइफसाइंसेज ला USFDA कडून empagliflozin आणि linagliptin संयुक्त गोळ्यांसाठी (10 mg/5 mg आणि 25 mg/5 mg) तात्पुरती मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी बाजारातील या कॉम्बिनेशनच्या रेफरन्स औषध Glyxambi च्या आधारे दिली गेली आहे.
Sona Comstar
Sona Comstar सरकारच्या रेअर अर्थ स्कीमसाठी प्रायमरी किंवा सेकंडरी अर्जदार म्हणून अर्ज करणार आहे. कंपनीचे MD विवेक विक्रम सिंह यांच्या म्हणण्यानुसार, Sona Comstar ही देशातील सर्वात मोठी रेअर अर्थ मॅग्नेट वापरणारी कंपनी आहे.
Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 10:46 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Friday Market Action: गुरुवार रात्रीच्या घोषणांनी वाढली उत्सुकता, 12 कंपन्यांच्या Shareची यादी फुटली


