Pune: खेडमध्ये शेतकऱ्याच्या घरात घुसण्याचा बिबट्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
बिबट्याच्या हल्ल्यानंतर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरे लावण्याची आणि गस्त वाढवण्याची मागणी केली.
सचिन तोडकर, प्रतिनिधी, पुणे - पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपूडी गावातील आंबेओहळ वस्तीवर ज्ञानेश्वर तनपुरे यांच्या घरात अचानक बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून बिबट्याच्या मुक्त संचाराने वाडी वस्तीवर लोक घाबरून गेले आहेत.
घटनेच्यावेळी शेतकरी तनपुरे हे घरातच होते. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आरडा ओरड करून बिबट्याला पळवून लावताना घरातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यामुळे अनर्थ टाळला. त्यानंतरही बिबट्या काही क्षण परिसरात घोटाळत होता. नंतर अंधाराचा फायदा घेत तो पळून गेला.
या घटनेनंतर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरे लावण्याची आणि गस्त वाढवण्याची मागणी केली. तर वनविभागाकडून ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला.
advertisement
उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत
उत्तर पुणे जिल्हा (विशेषतः जुन्नर, आंबेगाव, शिरूर भागांत) सध्या बिबट्याच्या दहशतीखाली आहे. बिबट्यांचे हल्ले वाढले असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत आणि अनेक ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. या परिस्थितीतून बचावासाठी काही महिलांनी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्यासारखे उपाय केले आहेत. वन विभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी आणि पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 27, 2025 10:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune: खेडमध्ये शेतकऱ्याच्या घरात घुसण्याचा बिबट्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद


