Virat Kohli : 'तुमचं चालू द्या, मी जातो...' विराटला सारखं बोलावलं, तरी आला नाही, 17 सेकंदाच्या Video ने केली पोलखोल!

Last Updated:

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाने सेलिब्रेशन केलं, पण यासाठी विराट कोहलीला बोलावलं तरी तो आला नाही. टीम इंडियाच्या हॉटेलमधला व्हिडिओ समोर आला आहे.

'तुमचं चालू द्या, मी जातो...' विराटला सारखं बोलावलं, तरी आला नाही, 17 सेकंदाच्या Video ने केली पोलखोल!
'तुमचं चालू द्या, मी जातो...' विराटला सारखं बोलावलं, तरी आला नाही, 17 सेकंदाच्या Video ने केली पोलखोल!
रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 17 रननी विजय झाला. विराट कोहली भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. विराटने 120 बॉलमध्ये 135 रनची खेळी केली, ज्यात 11 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. टीम इंडियाच्या या विजयानंतर भारताने हॉटेलमध्ये सेलिब्रेशन केलं. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने केक कापला. केक कटिंग सुरू असताना विराट कोहलीला यासाठी बोलावलं गेलं, पण याला विराटने स्पष्टपणे नकार दिला. यानंतर विराट थेट लिफ्टच्या दिशेने गेला. या सगळ्या घटनाक्रमाचा 17 सेकंदाचा व्हिडिओ समोर आला आहे.
केएल राहुल जेव्हा केक कट करत असताना त्याच्यामागे गौतम गंभीर आणि रोहित शर्मा उभे होते, तेव्हा दोघांमध्ये गहन चर्चा सुरू होती. तेव्हाच विराट त्यांच्याजवळून गेला. केक कट करत असताना विराटला तिकडे थांबण्यासाठी विनंती केली गेली, पण त्याने हात हलवून थांबायला नकार दिला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
advertisement
कोहलीने अशाप्रकारे इग्नोर केल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गंभीरमुळे कोहली सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला नाही, अशा कमेंट काही चाहत्यांनी केल्या आहेत. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधलं वातावरण खराब असल्याचं वृत्तही समोर आलं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही अनुभवी खेळाडूंचं कोच गौतम गंभीरसोबतचं नातं प्रभावित झालं आहे, ज्यामुळे बीसीसीआय चिंतेत आहे, असा खळबळजनक दावा या वृत्तात करण्यात आला आहे.
advertisement
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराटने शतक तर रोहितने अर्धशतक केलं, याचसोबत दोघांनीही पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करून दाखवलं आहे. 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये विराट आणि रोहित खेळणार का नाही? याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनीही याबाबत थेट उत्तर देणं टाळलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : 'तुमचं चालू द्या, मी जातो...' विराटला सारखं बोलावलं, तरी आला नाही, 17 सेकंदाच्या Video ने केली पोलखोल!
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement