Maruti आता पुढच्या 24 तासांमध्ये करणार मोठा धमाका, मार्केटमध्ये वारं फिरणार; गेमचेंजर SUV येतेय!
- Published by:Sachin S
Last Updated:
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी मोटर्स अखेरीस आता ईलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये पाऊल टाकत आहे.
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी मोटर्स अखेरीस आता ईलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये पाऊल टाकत आहे. मारुती सुझुकीची बहुप्रतिक्षित Maruti Suzuki E Vitara आता उद्या २ डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. मागील वर्षभरापासून Maruti Suzuki E Vitara बद्दल बरीच चर्चा सुरू होती, अखेरीस ही एसयूव्ही आता लोकांच्या समोर येणार आहे. या एसयूव्हीची थेट टक्कर आता टाटा मोटर्स आणि महिंद्राशी असणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
Maruti Suzuki E Vitara च्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर कारमध्ये नवीन डॅशबोर्ड दिला आहे, केबिनमध्ये ड्युअल-टोन थीम आहे, डॅशबोर्ड आणि सीट्स दोन्ही ड्युअल-टोन ब्लॅक आणि टॅन शेड्समध्ये फिनिश केलेलं आहे. तसंच एक नवीन टू-स्पोक स्टीअरिंग व्हील डिझाइन, ग्लॉस ब्लॅक इन्सर्ट, सेमी-लेदर सीट अपहोल्स्ट्री आणि ड्युअल-स्क्रीन सेटअप देखील असणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
Maruti Suzuki E Vitara च्या सुरक्षिततेबद्दल विचार केला तर, मारुती ई विटारामध्ये ७ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ३६०-डिग्री कॅमेरा दिला आहे. तसंच, युरो NCAP क्रॅश टेस्टमध्ये E विटाराला ४-स्टार सेफ्टी रेटिंग सुद्धा मिळाले होते.
advertisement
advertisement


