शॅम्पू आणि कंडिशनर केल्यानंतरही केस वाळल्यावर चिकटच राहतात किंवा धुतल्यानंतर काही वेळातच केस ऑयली होऊ लागतात. अशावेळी केसांवर घाण जास्त प्रमाणात चिकटते आणि हेअरस्टाईल करणेही कठीण होते. पण तुम्हाला माहिती आहे का की, केस चिकट का होतात आणि त्यावर उपाय काय आहेत? चला पाहूया.
केस चिकट का होतात?
केस धुतल्यानंतर चिकट होण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की स्कॅल्पमध्ये अतिरिक्त तेल साचणे, चुकीच्या प्रकारचा किंवा अयोग्य शॅम्पू वापरणे, घाणेरड्या हातांनी वारंवार केसांना स्पर्श करणे, वेगवेगळी हेअर प्रॉडक्ट्स लावणे. याशिवाय महिलांमध्ये हार्मोन्सच्या असंतुलनामुळेही केस चिकट होण्याची समस्या दिसून येते. तसेच जर तुम्ही फक्त केसांवर शॅम्पू लावत असाल आणि स्कॅल्प नीट स्वच्छ करत नसाल, तरीही केस चिकट राहू शकतात.
advertisement
केसांचा चिकटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय
- यासाठी कडुनिंब किंवा शिकाकाई पाण्यात भिजत घालून उकळा आणि त्या पाण्याने केस धुवा. केस धुतल्यानंतर ताजे अॅलोवेरा जेल केसांना लावा. आठवड्यातून एकदा केसांमध्ये मुलतानी मातीचा लेप नक्की लावा. यामुळे स्कॅल्प स्वच्छ होतो, अतिरिक्त तेल शोषले जाते, केस आणि स्कॅल्पला पोषण मिळते.
- केस चिकट होऊ नयेत यासाठी सल्फेट फ्री शॅम्पू वापरा आणि आठवड्यातून फक्त एकदाच केसांना तेल लावा. जास्त तेल लावणे टाळा. अनेक वर्षांपासून असे मानले जाते की, तेल लावल्याने केसांच्या मुळांना मजबुती मिळते, हे खरे आहे पण मर्यादित प्रमाणात. स्कॅल्पमध्ये आठवड्यातून एकदाच तेल लावा आणि त्यानंतर केस नीट स्वच्छ धुवा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
