हे फोड लहान असले तरी, कधीकधी वेदना आणि जळजळ इतकी जास्त असते की त्यामुळे खाणं-पिणं खूप कठीण होतं. तज्ज्ञांच्या मते, तोंडात अल्सर होण्याची कारणं पोट स्वच्छ नसणं, मसालेदार अन्न खाणं, पोटात उष्णता होणं, झोपेची कमतरता, ताणतणाव आणि शरीरात व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्सची कमतरता असू शकतात.
advertisement
तोंडातले फोड घालवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली औषधं आणि माउथवॉश वापरतात. पण यामुळे थोड्या काळासाठीच आराम मिळतो. अशावेळी, काही घरगुती उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
हळद आणि मध
हळद आणि मधाच्या वापरानं तोंडाच्या अल्सरच्या वेदना कमी होण्यास मदत होते. यासाठी अर्धा ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि चिमूटभर हळद मिसळा. दिवसातून दोन-तीन वेळा या पाण्यानं तोंड धुवा. हळदीतले बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारे गुणधर्म आणि मधाचे उपचारात्मक गुणधर्म अल्सर लवकर बरे करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
Neem Leaves : आरोग्यासाठी फायदेशीर कडुनिंब, शरीराचं सुरक्षा कवच असलेली औषधी वनस्पती
नारळ पाणी आणि नारळ तेल
नारळाच्या तेलाची प्रकृती थंड असते. दररोज नारळाचे पाणी प्यायल्यानं पोटातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि अल्सर लवकर बरे होतात. तोंडात नारळाचे तेल घालून दोन-तीन मिनिटं तोंड धुतल्यानं सूज आणि जळजळ दूर होते.
तुळस आणि गुळवेलाचा रस
सकाळी रिकाम्या पोटी चार-पाच तुळशीची पानं चावून कोमट पाणी प्या. यासोबत गुळवेलीचा रस देखील घेऊ शकता. तुळशीतले अँटीसेप्टिक गुणधर्म आणि गुळवेलीतले रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांमुळे तोंडातले फोड कमी होण्यास मदत होते.