आठ मिनिटं तीव्र रागाचाही शरीराच्या रक्तवाहिन्यांना त्रास होऊ शकतो असं संशोधनात आढळून आलं आहे. शास्त्रज्ञांच्या मते, या अल्प कालावधीच्या रागानंतर रक्तवाहिन्यांची विस्तारण्याची क्षमता जवळजवळ निम्म्यानं कमी होते आणि हा परिणाम सुमारे चाळीस मिनिटं टिकला तर हृदयाला शारीरिक धोका देखील निर्माण होऊ शकतो. राग ही केवळ भावनिक प्रतिक्रिया नाही तर तुमच्या शरीरावर परिणाम करते ते समजावून घेऊया.
advertisement
Jal neti : जलनेती कशी करतात ? जलनेती केल्यानं काय फरक जाणवतो ?
अमेरिकेतील अनेक संस्थांमधील संशोधकांनी 280 निरोगी प्रौढांवर हा अभ्यास केला. त्यांना चार गटांमधे विभागण्यात आलं होतं.
काहींना रागावलेल्या, दुःखी किंवा चिंताग्रस्त झालेल्या घटनेची आठवण करण्यासाठी आठ मिनिटं घालवण्यास सांगण्यात आले, तर दुसऱ्या गटाला तटस्थ राहण्यास आणि फक्त आकडे मोजण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर शास्त्रज्ञांनी त्यांच्या रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता तपासली, विशेषतः त्या किती चांगल्या प्रकारे विस्तारू शकतात हे तपासलं.
ज्यांना रागाच्या भरात घडलेली घटना आठवली त्यांच्या रक्तवाहिन्यांच्या विस्तारण्याच्या क्षमतेत स्पष्ट घट दिसून आली, तर ज्यांना दुःख किंवा चिंता जाणवली त्यांच्यात असा कोणताही परिणाम दिसून आला नाही. याचा अर्थ असा की राग हृदयावर इतर नकारात्मक भावनांपेक्षा वेगळ्या आणि अधिक प्रभावीपणे दबाव आणतो.
जेव्हा आपण रागावतो तेव्हा शरीरात कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईन सारखे ताण संप्रेरक वेगानं वाढतात. यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाचं आकुंचन होऊ शकतं, ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि रक्तदाब वाढू शकतो.
Leg Cramps : पायात पेटके का येतात ? जाणून घेऊया कारणं आणि उपचारपद्धती
रागाच्या एका उद्रेकामुळे कायमचं नुकसान होत नाही, पण ते वारंवार घडलं तर रक्तवाहिन्यांना सामान्य स्थितीत परत येण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. दीर्घकाळात, ही स्थिती प्लेक जमा होण्याचा, हृदयविकाराचा झटका येण्याचा किंवा स्ट्रोकचा धोका वाढवू शकते.
एखादी व्यक्ती अनेकदा चिडचिड करत असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावत असेल तर त्यांनी तणाव व्यवस्थापन तंत्रांचा अवलंब केला पाहिजे असा सल्ला तज्ज्ञांनी या संशोधनाअंती दिला आहे.
नियमित व्यायाम करणं, खोल श्वास घेणं, योगासनं करणं, ध्यान करणं यासारख्या तंत्रांमुळे हृदय सुरक्षित राहू शकतं. तसंच गरज लागली तर समुपदेशक किंवा थेरपिस्टशी बोलणं देखील फायदेशीर ठरू शकतं.
