कारंजी हा केवळ एक गोड पदार्थ नसून, विविध प्रादेशिक परंपरांना जोडणारा एक महत्त्वाचा घटक आहे. करंजीचा इतिहास आणि तिच्या नावामागे दडलेली कथा खूपच रंजक आहे. चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती..
करंजीचे मूळ आणि प्रादेशिक स्वरूप
करंजी हा पदार्थ प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भारत (महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश/तेलंगणा) या प्रदेशांशी जोडलेला आहे. हा भारतीय उपखंडात शतकानुशतके बनवला जात आहे. करंजीचे मूळ कोणत्या एका विशिष्ट ठिकाणाहून आले हे सांगणे कठीण असले तरी, याला प्रत्येक प्रदेशात वेगळे नाव आहे आणि सारणात थोडाफार बदल आहे.
advertisement
- महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये याला करंजी संबोधले जाते.
- उत्तर भारतात करंजीला 'गुजिया' किंवा 'घुघरा' असे संबोधले जाते. येथे करंजीच्या सारणात खवा वापरला जातो.
- गुजरातमध्ये ही घुघरा म्हणून ओळखली जाते.
- कर्नाटकात करंजीला कज्जिकाया असे म्हणतात.
म्हणूनच करंजी हा भारतीय उपखंडातील, विशेषतः पश्चिम आणि दक्षिण भारतातील पारंपरिक फराळातला एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय घटक आहे.
करंजी हे नाव कसं पडलं?
करंजी या पदार्थाचे नाव पडण्यामागे दोन मुख्य शक्यता आहेत.
1. करंजीच्या आकारावरून..
- करंजीचा आकार अर्धचंद्राकृती असतो. म्हणून तिला करंजी असे संबोधले जाते.
- भारतात 'करंज' नावाचे एक झाड आढळते, ज्याला लागणाऱ्या शेंगांचा किंवा बियांचा आकार या पदार्थासारखा अर्धचंद्राकृती असतो. या 'करंजा'च्या फळाच्या आकारावरूनच या पदार्थाला 'करंजी' हे नाव पडले असावे, असे मानले जाते. ही शक्यता सर्वाधिक प्रचलित आहे.
2. कापणी करण्याच्या पद्धतीवरून..
- काही लोकांच्या मते, करंजीच्या कडा कातणी नावाच्या विशिष्ट साधनाने कापल्या जातात. ही कातणी करंजीला सुंदर वळण देते.
- 'कातरून' तयार केलेला पदार्थ म्हणून त्याला करंजी असे नाव पडले असावे.
आकाराबद्दलचा पहिला मुद्दा जास्त प्रचलित असला तरी करंजी हे नाव तिच्या सुंदर, वळणदार आकृतीमुळे आणि तिला कापून दिलेल्या किनारामुळेच मिळाले आहे.