चुकीच्या आहारामुळे रक्तदाब वाढतो हे सिद्ध झालंय त्यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आहार योग्य असणंं गरजेचं आहे. या संदर्भात, प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर एरिक बर्ग यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत डॉक्टरांनी उच्च रक्तदाबाच्या समस्येत फायदेशीर असलेल्या काही खास गोष्टी सांगितल्यात.
Tur Dal : जेवणात तूर डाळीचं प्रमाण जास्त असेल तर थांबा, ही माहिती आधी वाचा
advertisement
डॉ. बर्ग यांच्या मते, उच्च रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यासाठी, मॅग्नेशियम असलेले पदार्थ खाणं सर्वात महत्वाचं आहे. रक्तदाब कमी करण्यासाठी मॅग्नेशियम खूप प्रभावी खनिज आहे. यामुळे नसांना आराम मिळतो आणि रक्तप्रवाह योग्य राखता येतो.
मॅग्नेशियमसाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, भोपळ्याच्या बिया आणि डार्क चॉकलेटचा समावेश करू शकता. यापैकी डार्क चॉकलेट सर्वात फायदेशीर आहे. डार्क चॉकलेटमधे मॅग्नेशियम तसंच नायट्रिक ऑक्साईड असतं, यामुळे रक्तवाहिन्यांचं प्रसरण करणं शक्य होतं. यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.
व्हिटॅमिन डी3 - मॅग्नेशियम व्यतिरिक्त, व्हिटॅमिन डी3 मुळेही रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण होऊ शकतं, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.
सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी3 चा नैसर्गिक स्रोत आहे. आहारात, चरबीयुक्त मासे, अंड्याचा पिवळा भाग, दूध, दही, चीज, देशी तूप आणि बटर खाऊ शकता.
Fenugreek Seeds : घराघरांतलं औषध - मेथीचे दाणे, अनेक रोगांवर रामबाण उपाय
पोटॅशियम - उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी पोटॅशियम महत्त्वाचं आहे. शरीरातील सोडियमचा प्रभाव कमी करणं आणि रक्तदाब सामान्य पातळीवर आणण्यासाठी यामुळे मदत होते. पोटॅशियमसाठी, आहारात केळी, नारळ पाणी, पालक, एवोकॅडो आणि रताळं यासारख्या पदार्थांचा समावेश करा.
उच्च रक्तदाब नियंत्रित करणं कठीण नाही. डॉ. बर्ग यांच्या मते, आहारात मॅग्नेशियम, व्हिटॅमिन डी3 आणि पोटॅशियमचा समावेश करा. डार्क चॉकलेटसारख्या आरोग्यदायी पर्यायांमुळे रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.