वजन कमी करण्यासाठी, औषधोपचार आणि व्यायामाशिवाय योग हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग असू शकतो. काही योगासनांमुळे मांड्यांवरची चरबी कमी करण्यासाठी मदत होते आणि मांड्या मजबूत देखील होतात. ही आसनं दररोज फक्त 15-20 मिनिटं केली तर मांड्यांसह शरीरातील चरबी कमी होण्यासाठी मदत होते. आयुष मंत्रालयानंही योगासनांबद्दल माहिती देताना याचा उल्लेख केला आहे.
advertisement
Periods : मासिक पाळीतला त्रास होईल कमी, आयुर्वेदिक उपचारानं ते दिवस होतील सुसह्य
उत्कटासन: या आसनात शरीराची स्थिती खुर्चीसारखी असते. हे योगासन मांड्या, कंबर आणि पाठीच्या खालच्या स्नायूंवर परिणाम करतं आणि चरबी कमी करण्यासाठी यामुळे मदत होते. हे आसन करण्यासाठी, प्रथम सरळ उभं राहा आणि दोन्ही हात समोर पसरवा आणि गुडघे वाकवून खाली वाका. काही सेकंद या स्थितीत रहा.
त्रिकोणासन: या आसनामुळे शरीराच्या बाजूच्या भागांवर, विशेषतः कंबर आणि मांड्यांवर दबाव येतो. याच्या दैनंदिन सरावामुळे केवळ चरबी कमी होणार नाही तर शरीर लवचिकही होईल. या आसनात दोन्ही पाय पसरून उभं राहावं लागतं. आता एक हात खाली वाकवून पायाजवळ आणा आणि दुसरा हात वर उचला.
Oral Care : निरोगी दातांंचं रहस्य, मौखिक आरोग्यासाठी खास टिप्स, नक्की वापरुन पाहा
वीरभद्रासन: हे आसन केल्यानं केवळ मांडीची चरबी कमी होत नाही तर शरीराचं संतुलन आणि शक्ती देखील वाढते. यात, एक पाय पुढे आणि दुसरा मागे ठेवा आणि पुढचा पाय गुडघ्यांपासून वाकवा. दोन्ही हात वर करा आणि काही काळ ही स्थिती कायम ठेवा.
भुजंगासन: मणक्यासोबतच, ते मांड्यांवर देखील परिणाम करते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि चरबी कमी होते. हे आसन करताना, पोटावर झोपा, हात खाली टेकवून शरीराचा वरचा भाग वर उचला.
पश्चिमोत्तानासन: या योगासनामुळे पोट आणि मांड्यांना खोलवर ताण मिळतो, यामुळे चयापचयाचा वेग वाढतो आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगानं होते. यासाठी जमिनीवर बसा आणि दोन्ही पाय समोर पसरवा आणि पुढे वाकून दोन्ही हातांनी पाय धरा.
