साहित्य:
शेंगदाण्याचे कूट
वेलची पूड
तूप/तेल
साखर
ड्रायफ्रूट
गव्हाचे पीठ
कृती:
१. सर्वप्रथम शेंगदाणे, साखर, ड्रायफ्रूट आणि वेलची एकत्र करून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
२. गव्हाचे पीठ मळून घ्या. त्यात थोडं तेल आणि मीठ घालून मस्त मळा. यामुळे पोळी खुसखुशीत होईल.
३. आता पीठ लाटून त्यात तयार केलेलं शेंगदाण्याचं पुरण भरायचं. पुरण नीट पसरून, उरलेलं पीठ दाबून बंद करायचं.
advertisement
४. त्यानंतर पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची.
५. पोळी तव्यावर टाकण्यापूर्वी तव्यावर तूप किंवा तेल लावायचं, यामुळे पोळी मऊ राहील आणि चिकटणार नाही.
६. दोन्ही बाजूंनी छान शिजवून घ्या, आणि बस्स, तुमची शेंगदाणा पुरणपोळी तयार!
ही पुरणपोळी अगदी घरात असलेल्या साहित्यापासून बनवता येते. चवीला मस्त लागणारी ही पोळी तुम्ही दही, दूध किंवा आमरसासोबत खाऊ शकता. साखर तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता, पण हे तेवढंच खरं आहे की ही पोळी कोणाही अगदी आवडीने खाईल.