मूत्रपिंडाशी संबंधित कोणत्याही समस्येच्या बाबतीत, लघवीत काही बदल दिसू लागतात. वारंवार लघवी होणं, लघवीत रक्त येणं किंवा लघवी करताना वेदना होणं असे बदल दिसतात पण मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणं लघवीव्यतिरिक्त शरीराच्या इतर भागातही दिसू शकतात.
मूत्रपिंडाच्या आजाराची सुरुवातीची लक्षणं ओळखली तर नुकसान टाळता येऊ शकतं. ही लक्षणं अनेकदा मूत्रपिंड विकाराची आहेत हे समजून येत नाही, त्यामुळे याकडे दुर्लक्ष होऊ शकतं, त्यामुळे ही माहिती पूर्ण वाचा.
advertisement
Migraine: मायग्रेनच्या दुखण्यावर घरगुती उपाय, तीव्र डोकेदुखीतून मिळेल आराम
त्वचा कोरडी होणं आणि खाज सुटणं - शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून खनिज संतुलनाचं महत्त्वाचं काम मूत्रपिंड करतात. पण हे कार्य बिघडतं तेव्हा रक्तात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. यामुळे त्वचा खरखरीत, कोरडी होते आणि अंगाला खाज सुटू शकते. कधीकधी, त्वचेवर पिवळे किंवा तपकिरी डाग दिसतात. ही लक्षणं केवळ वरवरच्या त्वचेच्या समस्येचेच संकेत असतीलच असं नाही तर मूत्रपिंडाशी संबंधित समस्यांचेही असू शकतात.
डोळं आणि पायांना सूज येणं - मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे शरीरात सोडियम आणि पाणी साचतं, ज्यामुळे एडेमा होतो. ही सूज विशेषतः सकाळी अनेकदा डोळ्यांभोवती दिसून येते. घोट्या आणि पायाच्या बोटांमध्येही सूज येऊ शकते, जी दिवसभर वाढत जाते. ही सूज मूत्रपिंड शरीरातून अतिरिक्त द्रव काढून टाकण्यास असमर्थ असल्याचे लक्षण आहे.
Digestion: पचनाच्या समस्येवर करा झटपट उपाय, पोटाला लगेच मिळेल आराम
निद्रानाश आणि थकवा - निरोगी मूत्रपिंड एरिथ्रोपोएटिन हा संप्रेरक तयार करतात, जो लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतो. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे या संप्रेरकाचं उत्पादन कमी होतं, ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो, सतत थकवा जाणवू शकतो, ताकद कमी वाटते. शिवाय, रक्तात विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे निद्रानाश होऊ शकतो.
लक्ष केंद्रित न होणं - योग्यरित्या लक्ष केंद्रित न करणं हे देखील मूत्रपिंडाच्या समस्येचं लक्षण असू शकतं. अशक्तपणामुळे मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचू शकत नाही, ज्यामुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते.
