निरोगी आरोग्यासाठी दात महत्त्वाचे
असं म्हणतात ज्या व्यक्तीचे दात मजबूत आणि निरोगी असतात ती व्यक्ती सहसा आजारी पडत नाही. मुळातच दातांमुळे अन्न बारीक होऊन पचनसंस्था मजबूत होते. आता विचार करा जर तुम्हाला दातांचे किंवा हिरड्यांचे आजार असतील तर तुम्ही अन्न नीट चावून खाऊ शकत नाही. त्यामुळे अन्न पचायला जड जाईल. त्यामुळे पचनापासून विविध समस्यांचा त्रास सुरू होऊ शकतो. जर तुमचे दात किडलेले असतील तर तुम्हाला हृदयविकार, मधुमेह आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे दात सुसस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला काही वाईट सवयी सोडून द्याव्या लागणार आहेत.
advertisement
दातांची काळजी घेण्यासाठी टाळा 'या' चुका
जंक फूड:-
जर तुम्हाला आठवत असेल तर आजी आजोबा नेहमी सांगायचे की, एक घास 32 वेळा चावून खायचा. जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरायची. हाताने दात आणि हिरड्या व्यवस्थित चोळून साफ करायच्या. मात्र सध्या जंक फूडमुळे उभ राहून खाण्याचं, किंवा चालता बोलता खाण्याचं प्रमाण वाढलंय. बर्गर, वडापाव, किंवा अन्य पदार्थ उभ्याने खाण्याच्याप्रकारामुळे अन्न नीट पचत नाही. त्याशिवाय काही खाल्ल्यानंतर तोंड नीट न धुतलं गेल्याने दातांमध्ये अन्न पदार्थांचे कण अडकून दात किडायला सुरूवात होते.
खारट आणि कुरकुरीत पदार्थ :-
सध्या बाजारात विविध प्रकारचे वेफर्स आणि कुरकुरीत पदार्थ उपलब्ध आहेत. अशा अन्नपदार्थांत सोडियम आणि स्टार्चही भरपूर प्रमाणात आढळून येतो. या स्टार्चचं रूपांतर नंतर साखरेत होतं. जे आरोग्यासाठी हानिकारक तर आहेच, मात्र असे पदार्थ खाल्ल्यानंतर दातांमध्ये प्लाक जमा होऊन पुढे दातांमध्ये कॅव्हिटी निर्माण होते. यात विविध प्रकारचे बॅक्टेरिया आणि बुरशी वाढतात ज्यामुळे दात किडण्यास सुरूवात होऊन ते कमकुवत होऊन पडू लागतात.
हे सुद्धा वाचा: Health Tips: ब्रश करण्याची योग्य पद्धत माहितीय का? चूक कराल तर होईल नुकसान
गोड पदार्थ:-
जर तुम्ही चॉकलेट, कँडी किंवा गोड पदार्थ जास्त खात असाल तर तुमचे दात किडण्याचा धोका हा अधिक असतो. गोड पदार्थांमध्ये अनेक प्रकारचे हानिकारक ॲसिड असतात जे केवळ दातांना किडण्यास कारणीभूत ठरत नाहीत तर दातांच्या इनॅमलच्या वरच्या थराला देखील नष्ट करतात.
आंबट पदार्थ:-
अति प्रमाणात आंबट पदार्थांचं सेवन देखील दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. हिवाळ्यात रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त फळं खाण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देतात. मात्र व्हिटॅमिन सी युक्त फळं किंवा भाज्यांचं सेवन नियंत्रित प्रमाणात करा कारण त्यात असलेल्या सायट्रिक ॲसिडमुळे दातांच्या पहिल्या थराला नुकसान होते. त्यामुळे व्हिटॅमिन सी युक्त फळं किंवा आंबट पदार्थांचं अतिसेवन टाळा किंवा अशा गोष्टी खाल्ल्यानंतर तोंड लगेच पाण्याने धुवा किंवा यामुळे सायट्रिक ऍसिडचा प्रभाव कमी होऊन दात सुस्थितित राहतील.
हे सुद्धा वाचा : Oral hygiene खराब टूथब्रश बनेल हार्ट ॲटॅकचं कारण, योग्यवेळी बदला टूथब्रश
कार्बोनेटेड ड्रिंक्स:-
नवीन पिढीसाठी कार्बोनेटेड ड्रिंक्स जीव की प्राण झाली आहेत. मग ती सॉफ्ट ड्रिंक्स असोत किंवा किंवा हार्ड ड्रिंक्स किंवा मॉकटेल्स. कार्बोनेटेड ड्रिंक्स हे आरोग्यासाठी तसेच दातांसाठी केव्हाही वाईटच. त्यामुळे ते टाळणं केव्हाही चांगलं.
थंड पदार्थ:-
तुम्हाला तुमचे दात सुस्थितित हवे असतील आणि तुम्हाला खूप थंड गोष्टी खाण्याची सवय असेल तर ती सोडून द्या. कारण थंड पदार्थ बराच वेळ तोंडात राहिल्याने ते दातांना नुकसान पोहचवू शकतात. हिरड्यांना सूज येऊ शकते. त्यामुळे असे पदार्थ तुमच्या खाण्यात किंवा पिण्यात आले तर ते लवकर संपवा. (उदा. आईस्क्रिम फार वेळ तोंडात ठेवू नका. थंड पाणी किंवा कोणत्याही प्रकारचं अतिथंड पेय हे तोंडात भरून ठेवू नका.)
हिवाळ्यात थंडीमुळे अनेकांच्या दातांना वळ येतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर ते ब्रश करणं टाळतात. मात्र असं करणं तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी आणि शरीर स्वास्थासाठी धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे हिवाळ्यात कोमट पाण्याने स्वच्छ ब्रश करणं हे केव्हाही चांगलं.
हे सुद्धा वाचा : Dental Care : थंडीत तुमचेही दात दुखतात का? समोर आलं कारण, घरच्या घरी करा हे उपाय
या साध्या सोप्या टिप्स वापरून हिवाळ्यात तुम्ही दातांची काळजी घेऊन तुमच्या दातांना मजबूत आणि चमकदार करू शकता.