संत्र्याच्या सालीचा वापर करून दातांवरील डाग घालवण्यास मदत होऊ शकते. संत्र खायला चविष्ट असतातच तसंच त्याचं साल त्वचेसाठी आणि दातांसाठी खूप फायदेशीर असतं. त्यात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. याचा उपयोग दातांमधील विषाणू काढून टाकण्यासाठी आणि त्यांना चमक देण्यासाठी होतो.
संत्र्याच्या सालीचा वापर कसा करावा ?
ताज्या संत्र्याचं साल घ्या आणि त्याचा आतील पांढरा भाग दातांवर हलक्या हातानं घासा. दोन-तीन मिनिटं घासल्यानंतर, पाच मिनिटं तसंच राहू द्या. नंतर नेहमीच्या टूथपेस्टनं दात घासा. ही प्रक्रिया आठवड्यातून तीन चार वेळा करा. यामुळे दातांवरील पिवळा थर हळूहळू निघून जाईल आणि दात चमकदार दिसू लागतील.
advertisement
Platelets : प्लेटलेट्स म्हणजे काय रे भाऊ ? निरोगी व्यक्तीत किती प्लेटलेटस गरजेच्या ? जाणून घ्या
केवळ संत्रीच नाही तर केळी, लिंबू आणि पपईची सालं देखील दात स्वच्छ पांढरे करण्यासाठी उपयुक्त आहेत.
केळीची साल: केळीच्या सालातल्या पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुले दातांवरील घाण काढून टाकण्यासाठी मदत होते.
लिंबूची साल: लिंबाच्या सालातील सायट्रिक आम्ल डाग काढून टाकण्यास मदत करते, परंतु आठवड्यातून दोनदापेक्षा जास्त वेळा हे वापरू नका.
पपईची साल: पपईची सालातलं पपेन एंझाइम दात स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त आहे.
Skin Care : चेहऱ्यासाठी पपई फेसपॅक, पपईचा गर करेल त्वचा मखमली, या टिप्सचा होईल उपयोग
या गोष्टी लक्षात ठेवा:
एखादा उपाय मिळाला म्हणून तो सतत आणि जास्त प्रमाणात करू नका कारण काही फळांमधल्या आम्लामुळे दातांवरचा मुलामा खराब होऊ शकतो.
दातदुखी, दात संवेदनशील होणं किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.
या घरगुती उपायांसोबतच, दररोज ब्रश करणं, फ्लॉस करणं आणि माउथवॉश वापरणं देखील महत्त्वाचं आहे.
पांढरे दात येण्यासाठी महागड्या उपचारांची गरज नाही. घरात असलेल्या संत्री, केळी आणि लिंबू यासारख्या फळांच्या साली नैसर्गिकरित्या दात पांढरे करू शकतात. नियमित काळजी घेऊन आणि योग्य पद्धतीचा अवलंब करून, तुम्ही तुमचे हास्य पुन्हा चमकू शकता.
