गाझियाबाद : आपल्या आयुष्याचा जोडीदार आपण स्वतः निवडावा ही विचारसरणी समाजात आता बऱ्यापैकी रुजली आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी आजही प्रेमविवाहाला कुटुंबियांकडून कडाडून विरोध होतो. अगदी त्या दोघांचं लग्न झालं तरीही घरचे त्यांना स्वीकारायला तयार नसतात. मग अशा स्थितीत नेमकं करावं काय, हेच त्या दोघांना कळत नाही. यावर राज्यघटनेत उपाय आहे.
advertisement
वरिष्ठ वकील ताहिर हुसैन सांगतात, भारतीय राज्यघटनेच्या कलम 21मध्ये प्रोटेक्शन ऑफ लाइफ अँड पर्सनल लिबर्टीबाबत माहिती दिलेली आहे. म्हणजेच हा कायदा व्यक्तीला जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार देतो.
5 वर्षांचं प्रेम, घरच्यांनी पकडलं नको त्या अवस्थेत; लावून दिलं लग्न, तरी प्रियकर तुरुंगात! का?
आपल्या भारतात वयाची 21 वर्ष पूर्ण झाल्यावर तरुणाला आणि वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर तरुणीला लग्न करण्याचा अधिकार कायद्यानुसार आहे. ते दोघंही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सज्ञान असल्यामुळे आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडू शकतात, असं कायदा सांगतो.
दिसायला लहान, तरी वयात आल्यापासून आई होईपर्यंत महिलांसाठी रामबाण; किचनमधला 'हा' पदार्थ!
जेव्हा सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून दोघांचं लग्न होतं, तेव्हा त्यांच्याविरोधात कुटुंबीय कोणत्याही प्रकारची कारवाई करू शकत नाहीत. कलम 21मध्ये दाम्पत्याला सुरक्षितता मिळते. पत्नीला कुटुंबियांकडून घरात बंद करून ठेवलं किंवा नवऱ्याला कुटुंबियांकडून कोणत्याही प्रकारच्या धमक्या मिळाल्या तर त्यांना न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. त्यानंतर मनाप्रमाणे लग्न केलं म्हणून त्रास देणाऱ्या कुटुंबियांवर कारवाई होऊ शकते. परंतु जर पत्नीने हे लग्न तिच्या मनाविरुद्ध झालं, असं सांगितलं तर मात्र हे प्रकरण वेगळं वळण घेऊ शकतं.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g