न्याहारी करणं शरीरासाठी आवश्यक आहे. रात्रीच्या जेवणानंतर, झोप झाली, दिवस सुरु झाला की, शरीराला उर्जेची कमतरता भासते आणि सकाळी उठल्यावर शरीराला उर्जेची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे तुम्ही नाश्ता वगळला तर शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि याचा परिणाम हळूहळू तुमच्या आरोग्यावर होतो.
नाश्ता न केल्यानं रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि या सवयीमुळे लठ्ठपणा वाढतो. आरोग्य संशोधनानुसार, जे लोक नाश्ता वगळतात त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका तीस टक्के जास्त असतो. रक्तातील साखरेच्या असंतुलित पातळीमुळे हे परिणाम होतात.
advertisement
Kidneys : शरीरातल्या गाळण्या - मूत्रपिंडं, योग्य सवयींनी राहतील किडन्या शाबूत
नाश्ता वगळल्यानं शरीराला आवश्यक ग्लुकोज मिळत नाही. अशा परिस्थितीत, शरीराला त्याची साठवलेली ऊर्जा वापरावी लागते. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी शरीर अधिक इन्सुलिन तयार करतं, ज्यामुळे स्वादुपिंड थकतं.
नाश्ता वारंवार वगळल्यानं शरीर इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देऊ शकत नाही, ही स्थिती इन्सुलिन प्रतिरोधकता म्हणून ओळखली जाते, ज्यामुळे मधुमेह होऊ शकतो. नाश्ता न केल्यानं कॅलरीज कमी होतील आणि वजन कमी होईल असं वाटत असलं तरी ते योग्य नाही.
Bloating : पोटाच्या तक्रारींवर रामबाण उपाय, या बदलांनी सांभाळा पोटाचं आरोग्य
सकाळी काहीही न खाल्ल्यानं दिवसभर वारंवार भूक लागू शकते आणि दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात जास्त खाण्याची शक्यता असते.
भूक लगेच भागवण्यासाठी लोक फास्ट फूड, स्नॅक्स किंवा मिठाई जास्त खातात. जास्त खाल्ल्यानं शरीरात जास्त चरबी साठते. याच कारणांमुळे हळूहळू वजन वाढत.
याव्यतिरिक्त, नाश्ता न करण्याचा चयापचयावर परिणाम होतो. चयापचय प्रक्रियेद्वारे शरीर अन्न पचवतं आणि ऊर्जा निर्माण करतं. पण नाश्ता केला नाही तर चयापचय वेग मंदावतो, परिणामी कमी कॅलरीज बर्न होतात, थकवा येतो आणि उर्जेची पातळी कमी होते.
