वजन कमी करणं म्हणजे केवळ कमी खाणं किंवा जास्त व्यायाम करणं पुरेसं नाही; डिटॉक्सिफिकेशन आणि पुरेसं पोषण राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
शरीराची स्वच्छता आणि चयापचय सक्रिय करण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम वेळ आहे. म्हणून, काही भाज्यांच्या रसांनी सकाळची सुरुवात केली तर वजन कमी करण्याची प्रक्रिया नैसर्गिक आणि जलद होण्यास मदत होईल. पाहूया यासाठीचे काही पर्याय.
advertisement
दुधीचा रस - दुधीच्या रसामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पचनसंस्था देखील सुधारते. त्यात कॅलरीज कमी आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं, शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी हा रस उपयुक्त आहे आणि यामुळे भूक नियंत्रित राहते. सकाळी रिकाम्या पोटी दुधीचा रस प्यायल्यानं पोट स्वच्छ होतं आणि चरबी जमा होण्यास प्रतिबंध होतो.
Hair Care : आवळा आणि कोरफड केसांसाठी वरदान, जाणून घ्या वापरण्याची पद्धत
कारल्याचा रस - कारल्याच्या रसामधे असलेलं फायबर आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराचं पोषण होतं तसंच शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी आणि चयापचय गतिमान करण्यासाठीही याची मदत होते. कारल्याची चव कडू आहे, पण यात थोडा लिंबाचा रस घातला तर ते अधिक परिणामकारक ठरतं आणि पिण्यास सोपं होतं.
पालकाचा रस - पालकाच्या रसात फायबर आणि लोह असतं, यामुळे ऊर्जा मिळते आणि बराच काळ भूक लागत नाही. चरबी जाळण्याबरोबरच हा रस त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे.
Diwali : भाऊबीजेसाठी करा इन्स्टंट फेसपॅक, भावांसाठी खास लूकची तयारी
बीट ज्यूस - हा ज्यूस रक्त शुद्ध करणारा आहे आणि त्यात नायट्रेट्स असतात. यामुळे स्टॅमिना वाढतो. सकाळी ज्यूस प्यायल्यानं जास्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते आणि सक्रिय राहण्यासाठी मदत होते.
काकडीचा रस - हा रस डिटॉक्सिफायिंग एजंट म्हणून काम करतो. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
टोमॅटोचा रस - या रसातील अँटीऑक्सिडंट्स, विशेषतः लायकोपिन, वजन नियंत्रित करण्यास मदत करतात. हा रस भूक नियंत्रित करण्यास मदत करतो आणि चरबी जमा होण्यास प्रतिबंध करतो.
