Diwali : भाऊबीज करा खास, भावांसाठी पटकन होणाऱ्या फेशियलची माहिती, सोपे - पटकन होणारे फेसपॅक

Last Updated:

सण कोणताही असो, मुली चेहरा चांगला दिसावा यासाठी फेशियल, क्लीनअप करतात. पण मुलं तितकी काळजी घेत नाहीत. तुम्हालाही वेळ कमी असेल तर अगदी कमी वेळात हे फेस पॅक चेहऱ्यावर चमक आणतील. ही भाऊबीज स्पेशल करा.

News18
News18
मुंबई : फेशियल किंवा स्किन केअर टिप्सची माहिती देताना कायम मुलींचा चेहरा असतो. पण उद्याचा दिवस बहीण-भावांसाठी एकदम खास असतो. बहीण-भावाचे फोटो छान यायला हवे असतील तर चेहरा फ्रेश दिसायला हवा. वेळ कमी असेल तर इथे दिलेले तीन सोपे पर्याय खास मुलांसाठी.
सण कोणताही असो, मुली चेहरा चांगला दिसावा यासाठी फेशियल, क्लीनअप करतात. पण मुलं तितकी काळजी घेत नाहीत. तुम्हालाही वेळ कमी असेल तर अगदी कमी वेळात हे फेस पॅक चेहऱ्यावर चमक आणतील. ही भाऊबीज स्पेशल करा.
यासाठी घरी ठेवलेल्याच काही गोष्टींचा वापर करायचा आहे.
बेसन, चंदन, हळद - हे कॉम्बिनेशन वर्षानुवर्ष वापरलं जातंय. यासाठी, दोन चमचे बेसन, चिमूटभर हळद, थोडी चंदन पावडर आणि दूध मिसळून बारीक पेस्ट तयार करा. एक तास चेहऱ्यावर तसंच राहू द्या. नंतर, थंड पाण्यानं चेहरा धुवा.
advertisement
लिंबू आणि कोरफड - चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लिंबू वापरू शकता. त्यातलं सायट्रिक एसिड डाग कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. शिवाय, कोरफडीमुळे त्वचा मॉइश्चरायझ होते आणि हायड्रेटेड राहते. या फेस पॅकसाठी, दोन चमचे कोरफड गर आणि लिंबाचा रस मिसळा. चेहऱ्यावर लावा, पंधरा ते वीस मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर धुवा. यामुळे त्वचेवर चांगली चमक येईल.
advertisement
कॉफी आणि मधाचा फेस पॅक - हा फेस पॅक बनवण्यासाठी, दोन चमचे कॉफी पावडर आणि दोन चमचे मध एकत्र करा आणि चांगलं मिसळा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटं तसंच राहू द्या. नंतर, तुमचा चेहरा पाण्यानं धुवा. कॉफीमुळे त्वचेतील अशुद्धता आणि टॅनिंग काढून टाकण्यास मदत करते, तर मध तुमच्या त्वचेला शांत आणि मऊ करण्यास मदत करते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali : भाऊबीज करा खास, भावांसाठी पटकन होणाऱ्या फेशियलची माहिती, सोपे - पटकन होणारे फेसपॅक
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement