Hair Care : सुंदर आणि मजबूत केसांसाठी नैसर्गिक उपाय, आवळा आणि कोरफड वाढवेल केसांचं आरोग्य
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आवळा आणि कोरफड केसांसाठी वरदान ठरू शकतात. हे दोन्ही जिन्नस केस मजबूत आणि दाट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. निरोगी आणि चमकदार केस हवे असतील तर आवळा आणि कोरफडीचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.
मुंबई : चांगले आणि मजबूत केस प्रत्येकाला हवे असतात. पण, प्रदूषण , अयोग्य आहार आणि रसायनांचा जास्त वापर यामुळे केस कमकुवत, कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. यासाठी, केस पुन्हा निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी काही नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं.
आवळा आणि कोरफड केसांसाठी वरदान ठरू शकतात. हे दोन्ही जिन्नस केस मजबूत आणि दाट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. निरोगी आणि चमकदार केस हवे असतील तर आवळा आणि कोरफडीचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.
आवळ्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. यामुळे केस मुळांपासून मजबूत होतात, कोंडा काढून टाकायला मदत होते आणि केस अकाली पांढरे होण्यापासून रोखते.
advertisement
कोरफडीत मॉइश्चरायझिंग, थंडावा आणि उपचार करण्याचे गुणधर्म आहेत. यामुळे टाळूला आराम मिळतो, खाज आणि जळजळ कमी होते आणि केसांना नैसर्गिक चमक येते.
आवळा आणि कोरफडीचा हेअर मास्क - या मास्कमुळे केसांचं खोलवर पोषण होतं, ज्यामुळे ते मजबूत आणि चमकदार बनतात. मास्क बनवण्यासाठी, दोन चमचे ताजी आवळा पावडर, दोन चमचे ताजा कोरफडीचा गर, एक चमचा दही किंवा लिंबाचा रस. हे सर्व घटक नीट मिसळून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाळू आणि केसांच्या मुळांना लावा. अर्धा ते पाऊण तास तशीच राहू द्या. नंतर थंड पाण्यानं केस धुवा. आठवड्यातून एकदा हा मास्क वापरा.
advertisement
आवळा आणि कोरफडीचा गर वापरुन केस धुणं - हे एक नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतं आणि यामुळे केस मऊ होतात. एक कप पाणी, दोन चमचे आवळा पावडर,तीन चमचे कोरफडीचा गर घ्या. आवळा पावडर पाण्यात उकळा आणि थंड होऊ द्या. त्यात कोरफडीचा गर घाला आणि चांगलं मिसळा. शाम्पू केल्यानंतर, या मिश्रणानं केस चांगले धुवा. पाच-दहा मिनिटं तसंच राहू द्या, नंतर स्वच्छ पाण्यानं धुवा.
advertisement
आवळा तेल आणि कोरफडीचं मिश्रण - या मिश्रणानं केसांच्या वाढीला चालना मिळते. कोंडा दूर करण्यासाठी हे मिश्रण उपयुक्त आहे. दोन टेबलस्पून आवळा तेल, एक टेबलस्पून कोरफडीचा गर
आवळा तेल आणि कोरफडीचा गर मिसळा आणि थोडं गरम करा. या मिश्रणानं टाळूला दहा- पंधरा मिनिटं मसाज करा. एक-दोन तास किंवा रात्रभर तसंच राहू द्या. सौम्य शाम्पूनं केस धुवा. आठवड्यातून दोनदा वापरा.
advertisement
ताजा आवळा आणि कोरफडीचा पॅक - ताजा आवळा उपलब्ध असेल तर ही पद्धत खूप फायदेशीर ठरेल.
यासाठी दोन-तीन आवळे, दोन टेबलस्पून कोरफड गर घ्या. यासाठी आवळ्यांचा रस काढा किंवा बारीक पेस्ट करा. यात कोरफडीचा गर घाला आणि चांगलं मिसळा. ही पेस्ट टाळू आणि केसांना लावा. पाऊण तासानं केस धुवा.
advertisement
या गोष्टी लक्षात ठेवा - पहिल्यांदा वापरण्यापूर्वी, कोरफडीच्या जेलची ऍलर्जी तपासण्यासाठी त्वचेच्या लहान भागावर पॅच टेस्ट नक्की करा. केस खूप कोरडे असतील तर या मास्कमधे थोडं नारळ तेल किंवा जोजोबा तेल घालू शकता. केस निरोगी ठेवण्यासाठी, केसांची योग्य काळजी आणि निरोगी आहारही तितकंचं महत्त्वाचं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 23, 2025 6:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : सुंदर आणि मजबूत केसांसाठी नैसर्गिक उपाय, आवळा आणि कोरफड वाढवेल केसांचं आरोग्य