आयुर्वेद हे केवळ उपचार करण्याचं शास्त्र नाही तर जीवनशैली संतुलित आणि निरोगी बनवण्यासाठीही यात मार्गदर्शन केलं जातं. दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या सवयींचा शरीर आणि मनावर खोलवर परिणाम होतो. या सवयींपैकी एक म्हणजे वेळोवेळी केस आणि नखं कापणं.
आयुर्वेदानुसार, जेव्हा डोक्यावरील केस, मिशा किंवा नखं वाढतात तेव्हा शरीरावर अतिरिक्त भार जाणवतो. यामुळे थेट मानसिक आणि शारीरिक हालचालींवर परिणाम होतो. केस आणि नखं कापल्यानं शरीर हलकं वाटतं, ज्यामुळे ऊर्जा आणि कामात एकाग्रता वाढते.
advertisement
Collagen : कोलेजन वाढवण्यासाठी टिप्स, आयुर्वेदिक उपचारांनी त्वचा दिसेल टवटवीत
लांब नखं आणि अस्वच्छ केसांत धूळ, घाण आणि घाम सहज जमा होतो. या वातावरणात बॅक्टेरिया आणि बुरशी वाढते, ज्यामुळे संसर्ग आणि त्वचारोगांचा धोका वाढतो. नियमितपणे केस आणि नखं कापल्यानं या जीवाणूंचा संचय थांबतो आणि शरीर स्वच्छ आणि निरोगी राहतं.
अदृश्य सूक्ष्मजीव बहुतेकदा लांब नखांच्या कडांवर वाढतात. हे जीवाणू अन्न शिजवताना किंवा चेहऱ्याला स्पर्श करताना शरीरात प्रवेश करू शकतात. आयुर्वेदात याला रोगांचं प्रवेशद्वार मानलं जातं. नखं लहान आणि स्वच्छ ठेवल्यानं संसर्ग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. त्याचप्रमाणे, मिशांची नियमित काळजी घेतल्यानं चेहऱ्याचं सौंदर्य वाढतच तसंच ओठ आणि नाकाभोवती स्वच्छता देखील राखली जाते.
Bruise : काळ्या निळ्या डागावर हा उपाय नक्की करा, वेदना होईल कमी, डागही होईल नाहिसा
मन आणि शरीराच्या संतुलनावर आयुर्वेदात भर देण्यात आला आहे. केस आणि नखं वेळेवर कापणं हे फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर शरीराची स्वच्छता, आरोग्य आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी एक आवश्यक नियम आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपलं शरीर स्वच्छ ठेवते तेव्हा त्याची आभा आणि ऊर्जा दोन्ही वाढते असं आयुर्वेदात सांगण्यात आलंय. आयुर्वेदाच्या मते, ही आभा जीवनशक्ती (ओजस) मजबूत करते आणि दीर्घायुष्याचा आधार बनते.