विज्ञान किंवा आयुर्वेदात, दही आरोग्याच्या दृष्टीनं खूप फायदेशीर मानलं आहे. प्राचीन काळापासून दही आरोग्यदायी अन्न म्हणून ओळखलं जातं. पावसाळ्यात अनेकदा पोटाशी संबंधित समस्यांना जाणवतात तेव्हा दह्यापेक्षा ताक चांगलं असतं. हवामान कधी थंड कधी गरम असतं, अशा वेळी थंड प्रभाव असलेलं दही हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे कफ देखील वाढतो. अशा वेळी ताक निवडणं योग्य आहे.
advertisement
Salt : सैंधव मीठाचे फायदे वाचा, पचन, तणाव व्यवस्थापनासाठी उपयुक्त
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स उपयोगी -
अमेरिकन नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, दही हे नैसर्गिक बॅक्टेरियाच्या मदतीनं दुधाला आंबवून बनवलं जातं, ज्यामध्ये लॅक्टोबॅसिलससारखे प्रोबायोटिक्स असतात. प्रोबायोटिक्स आपल्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहेत कारण यामुळे आपल्या आतड्यांमधे चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढतात आणि हानिकारक बॅक्टेरिया यामुळे कमी होतात. यामुळे पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात.
Brain : सात सोप्या टिप्सनं मेंदू होईल तंदुरुस्त, स्मरणासंबंधित आजारांचा धोका होईल कमी
हाडांसाठी फायदेशीर
दह्यात प्रथिनं, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी12 सारखे आवश्यक पोषक घटक देखील असतात, यामुळे हाडं मजबूत करण्यासाठी आणि स्नायू विकसित करण्यासाठी मदत होते.
दह्याचे इतर फायदे -
दही नियमित खाल्ल्यानं आतड्यांतील सूज कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. पण बाजारात उपलब्ध असलेलं गोड दही अनेकदा साखरेचं प्रमाण जास्त असल्यानं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. याशिवाय, रात्री दही खाल्ल्यानं काहींना श्लेष्माची समस्या होऊ शकते, असं एका संशोधनात आढळून आलं आहे त्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार दही खाण्याचा निर्णय घ्यावा.
