TRENDING:

Suryanamaskar : सूर्यनमस्कारांचं महत्त्व समजून घ्या, शारीरिक - मानसिक संतुलनासाठी सर्वांगसुंदर व्यायाम

Last Updated:

सूर्यनमस्काराचा महत्त्वाचा पैलू म्हणजे या बारा आसनांमधून तुम्ही हालचाल करता तेव्हा तुमच्या छाती, पोट, हात, पाय आणि पाठीतील स्नायू सक्रिय होतात. या प्रक्रियेमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराच्या अवयवांना पुरेसं पोषण मिळतं. चयापचय देखील वेगवान होतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयुष मंत्रालयानं नुकतीच सूर्यनमस्कारांचं महत्त्व सांगणारी पोस्ट शेअर केली आहे. सूर्यनमस्कार हा योगाचा एक प्राचीन प्रकार. शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी सूर्यनमस्कार अत्यंत फायदेशीर मानले जातात. आयुष मंत्रालयानं शुक्रवारी इंस्टाग्रामवर सूर्यनमस्काराची बारा आसनं आणि त्याचं महत्त्व अशी पोस्ट शेअर केली.
News18
News18
advertisement

सूर्यनमस्कार करण्यापूर्वी, योग्य श्वासोच्छवास समजून घेणं महत्वाचं आहे. आयुष मंत्रालयाच्या मते, सुरुवातीला नमस्कार मुद्रेत तळवे जोडावेत, ज्यामुळे लक्ष केंद्रित करणं आणि मन स्थिर करण्यास मदत होते. या आसनामुळे मानसिक एकाग्रता वाढते तसंच शरीराची ठेवणही चांगली राहते.

Lifestyle Tips : खूप वेळ बसून काम करताय ? मग आधी ही माहिती वाचा

advertisement

सूर्यनमस्काराच्या या बारा आसनांमुळे शरीरातील जवळजवळ प्रत्येक स्नायू सक्रिय होतात. लवचिकता, वजन कमी करणं आणि चयापचय सुधारण्यासाठी देखील हा सूर्यनमस्कार प्रभावी आहेत. याव्यतिरिक्त, योग्य श्वास घेण्याच्या तंत्रांचा सराव केल्यानं मानसिक शांती आणि शारीरिक शक्ती मिळते असंही आयुष मंत्रालयानं यात स्पष्ट केलं आहे.

सूर्यनमस्कार करताना, जेव्हा तुम्ही मागे वाकता तेव्हा पाठीचा कणा वाकतो आणि फुफ्फुसं उघडतात, ज्यामुळे फुफ्फुसांमधे जास्त ऑक्सिजन वाहू लागतो. या प्रक्रियेत श्वास घेणं अत्यंत महत्त्वाचं असते, यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

advertisement

पुढच्या टप्प्यात, डोकं खाली वाकवल्यानं शरीरात रक्ताभिसरण सुधारतं. हे आसन विशेषतः डोकेदुखी आणि तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

याव्यतिरिक्त, जेव्हा शरीर पुढे वाकवता आणि तुमचे खांदे आणि कंबर सक्रिय करता त्यामुळे पाठदुखी आणि खांद्याच्या कडकपणा म्हणजेच stiffness कमी होतो. श्वास सोडताना आणि आत घेताना या आसनांचं अनुकरण केल्यानं स्नायूंना आराम मिळतो आणि त्यांची ताकद वाढते.

advertisement

सूर्यनमस्काराचा महत्त्वाचा पैलू म्हणजे या बारा आसनांमधून तुम्ही हालचाल करता तेव्हा तुमच्या छाती, पोट, हात, पाय आणि पाठीतील स्नायू सक्रिय होतात. या प्रक्रियेमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराच्या अवयवांना पुरेसं पोषण मिळतं. चयापचय देखील वेगवान होतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Ghee Benefits : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठीचं पारंपरिक औषध, वाचा सविस्तर

advertisement

सूर्यनमस्कार आसनांमधल्या वळणं, वाकणं आणि ताणण्याच्या हालचालींमुळे लवचिकता सुधारते. यामुळे स्नायूंना देखील बळकटी मिळते. याव्यतिरिक्त, नियमित सराव केल्यानं शारीरिक संतुलन आणि सहनशक्ती सुधारते.

सूर्यनमस्काराचे फायदे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा उलथापालथ, कापूस आणि तुरीला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

सूर्यनमस्काराचा नियमित सराव वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. या व्यायामामुळे संपूर्ण शरीरात कॅलरीज बर्न होण्यास मदत होते आणि चयापचय वाढतो. शरीराच्या अंतर्गत अवयवांसाठीही सूर्यनमस्कार फायदेशीर आहेत आणि यामुळे पचनक्रियाही सुधारते. यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Suryanamaskar : सूर्यनमस्कारांचं महत्त्व समजून घ्या, शारीरिक - मानसिक संतुलनासाठी सर्वांगसुंदर व्यायाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल