व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे वारंवार पाठदुखीचा सामना करावा लागू शकतो. व्हिटॅमिन डी म्हणजेच जीवनसत्व ड हाडं आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. यामुळे शरीरात कॅल्शियम शोषण्यास मदत होते. पण व्हिटॅमिन डीची कमतरता असते तेव्हा कॅल्शियम योग्यरित्या शोषलं जात नाही, ज्यामुळे हाडं कमकुवत होतात. यामुळे पाठ आणि कंबर दुखणं, स्नायूंमधे ताठरपणा येतो आणि थकवा जाणवतो.
advertisement
Bhadrasana : गुडघेदुखी आणि पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय - भद्रासन, वाचा भद्रासनाचे फायदे
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणं
नेहमी थकवा जाणवणं
हाडं आणि सांधेदुखी
स्नायू कमकुवत होणं
वारंवार सर्दी आणि संसर्ग किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती
बराच काळ पाठदुखीचा त्रास होत असेल आणि ही लक्षणं जाणवत असतील, तर व्हिटॅमिन डी पातळीची तपासणी करणं, म्हणजेच आवश्यकतेपेक्षा याचं प्रमाण किती कमी आहे हे तपासणं गरजेचं आहे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Black raisins : मनुका खाण्याचे आरोग्यदायी फायदे, अशक्तपणा घालवण्यासाठी, केस - त्वचेसाठी फायदेशीर
व्हिटॅमिन डीची पातळी कशी वाढवायची ?
योगगुरू हंसा योगेंद्र यांच्या मते दररोज दहा-पंधरा मिनिटं उन्हात बसल्यानं शरीरात व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होते. यासाठी आहारात दूध, दही, चीज, मशरूम, पालक, बदाम, अंजीर, मनुका आणि सुके आलुबुखार म्हणजेच प्लमचा समावेश करा. यामधे व्हिटॅमिन डीचं प्रमाण चांगलं असतं.
औषधांव्यतिरिक्त व्हिटॅमिन सप्लिमेंटचाही पर्याय आहे पण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.