TRENDING:

Eye Care : डिजिटल जगात घ्या डोळ्यांची काळजी, या रंगांची फळं - भाज्या खाणं फायदेशीर

Last Updated:

प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहे आणि स्क्रीन टाइम दिवसेंदिवस वाढतो आहे. स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्यानं डोळ्यांवर सर्वात जास्त परिणाम होतो. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करणं महत्त्वाचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हातात मोबाईल नव्हता तेव्हाचं आयुष्य आणि आताचं आयुष्य. आजच्या काळात डोळ्यांशी संबंधित समस्या खूप वाढतायत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डिजिटल जग. प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहे आणि स्क्रीन टाइम दिवसेंदिवस वाढतो आहे. स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्यानं डोळ्यांवर सर्वात जास्त परिणाम होतो. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करणं महत्त्वाचं आहे.
News18
News18
advertisement

आहारातल्या काही महत्त्वाच्या बदलांमुळे डोळे निरोगी ठेवता येतात. डिजिटल युगात मोबाईलचा अति वापर केल्यानं तब्येतीवर परिणाम होतायत. यासंदर्भात एक सर्वेक्षण नुकतंच करण्यात आलं.

Urine : लघवीच्या रंगात दडलंय तब्येतीचं गुपित, जाणून घ्या सविस्तर

द व्हिजन कौन्सिल ऑफ अमेरिकेकडून दहा हजारहून अधिक प्रौढांचं सर्वेक्षण झालं. यात पासष्ट टक्के अमेरिकन नागरिकांना संगणक, स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणं वापरताना डोळ्यांशी संबंधित लक्षणं जाणवतात.

advertisement

यात मुख्यत: कोरडेपणा, डोळ्यांची जळजळ, दृष्टी अंधुक होणं, डोळ्यांत थकवा जाणवणं आणि डोकेदुखी अशी लक्षणं आढळतात.

Oral Hygiene : दात, हिरड्या दुखतायत ? आयुर्वेदिक उपाय ठरेल परिणामकारक

डॉक्टरांच्या मते, चांगल्या दृष्टीसाठी लाल, नारिंगी किंवा पिवळ्या रंगाच्या भाज्या आणि फळं उपयुक्त ठरतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

यात भरपूर व्हिटॅमिन ए म्हणजेच बीटा कॅरोटीन असतं, हा घटक डोळ्यांसाठी खूप चांगला मानला जातो. मोबाईल चा वापर कमी करा, डोळ्यांसाठी आणि तब्येतीसाठी आहाराची चांगली काळजी घ्या आणि स्क्रीन टाइम देखील कमी करा. वेळोवेळी डोळे व्यवस्थित धुवा. डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी योग्य वेळी झोपणं महत्वाचं आहे. त्यामुळे पुरेशी झोप घ्या.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Eye Care : डिजिटल जगात घ्या डोळ्यांची काळजी, या रंगांची फळं - भाज्या खाणं फायदेशीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल