Urine : लघवीच्या रंगात दडलंय तब्येतीचं गुपित, जाणून घ्या सविस्तर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
लघवी आणि शौच हे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर काढून टाकण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुम्ही किती निरोगी आहात हे लघवीच्या रंगावरुन कळतं. लघवीचा रंग हलका पिवळा असतो तर कधीकधी तो अधिक पिवळा तर काही वेळा गडद पिवळा, नारिंगी तर काही वेळा लाल असू शकतो.
मुंबई : आपली तब्येत कशी आहे हे सांगणारे काही महत्त्वाचे निकष आहेत. त्यातला महत्त्वाचा म्हणजे रक्त चाचणी आणि युरिन टेस्ट. या दोन चाचण्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तसंच तुमचं खान पान व्यवस्थित आहे की नाही हे सांगणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लघवीचा रंग.
लघवी आणि शौच हे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर काढून टाकण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुम्ही किती निरोगी आहात हे लघवीच्या रंगावरुन कळतं. लघवीचा रंग हलका पिवळा असतो तर कधीकधी तो अधिक पिवळा तर काही वेळा गडद पिवळा, नारिंगी तर काही वेळा लाल असू शकतो.
लघवीचा रंग आरोग्याशी संबंधित आहे आणि यात अनेक गुपितं दडलेली आहेत. लघवीचा रंग बदलणं हे आजारांचं लक्षण देखील असू शकतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
लघवीचा रंग बदलण्यामागची संभाव्य कारणं -
पाण्याची कमतरता - पाणी पुरेसं न प्यायल्यानं लघवीचा रंग बदलू शकतो.
काही औषधांमुळे तसंच काही पदार्थांमुळेही लघवीचा रंग वेगळा दिसतो.
कावीळ, हिपॅटायटीस सारखे आजार किंवा मूत्रपिंडाचा आजार, मूत्रमार्गाचा संसर्ग झाल्यामुळेही लघवीचा रंह बदलतो.
advertisement
लघवीचा रंग बदलल्यावर कोणते उपाय लगेच सुरु करता येतील याकडे लक्ष द्या. डॉक्टर सल्ला देतीलच पण तोपर्यंत हे उपाय नक्की करा.
पाणी - लघवी पिवळ्या रंगाची होत असेल तर शक्य तितकं जास्त पाणी प्यावं.
फळं - पिवळ्या लघवीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, टरबूज, बेरी तसंच ज्या फळांत पाणी जास्त आहे अशी फळं खा.
advertisement
काकडी- काकडीत सुमारे नव्वद टक्के पाणी असतं. जळजळ होत असेल किंवा लघवीला त्रास होत असेल तर आहारात काकडीचा समावेश करा.
याव्यतिरिक्त, वेदना, जळजळ किंवा वारंवार लघवी होणं यासारखी लक्षणं जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण लघवीचा रंग बदललेला असणं हे एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 09, 2025 7:56 PM IST


