बटाट्यातील घटक
बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्च जास्त प्रमाणात असतात. यातील ग्लायसेमिक इंडेक्स उच्च असतो, ज्यामुळे बटाटा खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते.
शिजवण्याची पद्धत
बटाटा कसा शिजवला जातो, यावर त्याचे आरोग्यदायी मूल्य अवलंबून असते. तळलेला बटाटा जसे की चिप्स किंवा फ्रेंच फ्राईज आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत. त्याऐवजी, बटाटा उकळून, भाजून किंवा वाफवून खाणे चांगले.
advertisement
सालीसोबत खा
बटाट्याच्या सालीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. सालीसह खाल्ल्यास बटाट्यातील कार्बोहायड्रेट्स हळू पचतात आणि रक्तातील साखरेची पातळी लगेच वाढत नाही.
प्रमाण महत्त्वाचे
मधुमेहींसाठी बटाटा खाण्याचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे त्याचे प्रमाण. एका वेळेस जास्त बटाटा खाण्याऐवजी, फक्त एक लहान बटाटा किंवा त्याचा एक छोटा तुकडा खा.
योग्य कॉम्बिनेशन
बटाटा एकटा खाण्याऐवजी तो प्रोटीन आणि फायबर असलेल्या पदार्थांसोबत खा. उदाहरणार्थ, तुम्ही बटाटा भाज्या, डाळी किंवा पनीरसोबत खाऊ शकता. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
थंड केलेला बटाटा
एक खास टीप अशी की, उकडलेला बटाटा थंड झाल्यावर खाल्ल्यास त्यातील स्टार्च रेझिस्टंट स्टार्चमध्ये बदलते, ज्यामुळे तो पचायला अधिक सोपा होतो आणि साखरेची पातळी वेगाने वाढवत नाही. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने बटाटा खाल्ल्यास तो मधुमेहींसाठी हानिकारक नाही. तुमच्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)