TRENDING:

Relationship Tips : लग्न ठरलंय पण पार्टनर खरंच तुमच्याशी लॉयल आहे का? अशी करू शकता खात्री..

Last Updated:

Check partner loyalty with this tips : कधी कधी आपल्या लक्षातही न येता पार्टनरचे वागणे बदलते आणि मनात शंका येऊ लागते की आपला जोडीदार आपल्याशी प्रामाणिक आहे का? यासाठी आज आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : काहीवेळा लग्न ठरल्यानंतर किंवा लग्नानंतर आपल्याला आपल्या जोडीदाराच्या वागण्यात बदल दिसतो. रिलेशनशिपमध्ये विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. पण कधी कधी आपल्या लक्षातही न येता पार्टनरचे वागणे बदलते आणि मनात शंका येऊ लागते की आपला जोडीदार आपल्याशी प्रामाणिक आहे का? यासाठी आज आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत.
अशी ओळखा मायक्रो चीटिंग..
अशी ओळखा मायक्रो चीटिंग..
advertisement

अनेक छोटे-छोटे संकेत असतात, जे दाखवतात की पार्टनर कुणाकडे जास्त आकर्षित होत आहे किंवा तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे. अशा वागण्याला 'मायक्रो-चीटिंग' म्हटले जाते. याचा प्रत्यक्ष धोका नसला तरी यामुळे हळूहळू तुमच्या नात्यात वितुष्ट येऊ शकते.

अशी ओळखा मायक्रो चीटिंग..

- नवभारत टाइम्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, जर पार्टनर सतत लपून-छपून मेसेजिंग करत असेल किंवा सोशल मीडियावर तुमच्यापासून दूर राहून चॅट करत असेल, तर हा मायक्रो-चीटिंगचा इशारा असू शकतो. अशा गुप्त वागणुकीमुळे नात्यातील विश्वास कमी होतो आणि भावनिक अंतर वाढू लागते.

advertisement

- पार्टनर एखाद्या विशिष्ट व्यक्तीची गरजेपेक्षा जास्त स्तुती करत असेल, तर त्यामागे खास आकर्षण असू शकते. वारंवार कौतुक करणे हे त्या व्यक्तीकडे ओढा निर्माण झाल्याचे संकेत असू शकतात, ज्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो.

- अर्धसत्य सांगणे किंवा लहानसहान गोष्टींबाबत खोटे बोलणे हेही मायक्रो-चीटिंगचे लक्षण आहे. तुमच्या समोर एखाद्याचे मेसेज दुर्लक्ष करणे आणि नंतर गुपचूप रिप्लाय करणे. हे नात्यात पारदर्शकता कमी करते.

advertisement

- पार्टनर काही लोकांबद्दलच्या गोष्टी लपवत असेल किंवा त्या व्यक्तीशी असलेल्या नात्याबद्दल कुटुंब-मित्रांपासूनही गुपित ठेवत असेल, तर ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या महत्त्वाची होत असल्याचे हे लक्षण आहे.

- सोशल मीडियावर अनावश्यक वेळ घालवणे, सतत एका व्यक्तीच्या पोस्टला लाईक, कमेंट करणे किंवा त्याच्यासोबत वारंवार चॅट करणे. या सवयी नात्यातील अंतर वाढवू शकतात. डिजिटल जगातील हे सूक्ष्म बदल भावनिक जोड दर्शवतात.

advertisement

या गोष्टीही असतात महत्त्वाच्या..

जोडीदाराचे वागणे पारदर्शक आहे का? फोन-सोशल मीडिया लपवतो का? तुमच्यासोबत वेळ घालवण्याची इच्छा कमी झाली आहे का? अचानक मूड बदलतो का? तुमच्या उपस्थितीत जोडीदाराची वागणूक बदलते का? तुमच्या प्रश्नांना नीट उत्तर मिळते का? संवाद कमी झाला आहे का? या गोष्टी माहित असणंही अवश्य आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा पार्टनर तुमच्या भावनांना आदर देतो का? नाते मजबूत करण्यासाठी तो प्रयत्न करतो का? जर या गोष्टी सकारात्मक असतील तर तो तुमच्याशी प्रामाणिक असण्याची शक्यता जास्त असते. मात्र तरीही तुम्हाला काहीही चुकीचे जाणवल्यास आधी जोडीदाराशी याबद्दल मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे. कधी कधी हे संकेत गैरसमजही आशु शकतात. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एकदा शांतपणे विचार करावा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दराची घसरगुंडी कायम, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Relationship Tips : लग्न ठरलंय पण पार्टनर खरंच तुमच्याशी लॉयल आहे का? अशी करू शकता खात्री..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल