जालना : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील गूळ बाजारात लातूर येथील गावरान गूळ दाखल झाला आहे. या गुळाला 3900 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. नवीन वर्षातील मकर संक्रांती हा पहिलाच सण महिला भगिनी मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाला अतिशय महत्त्व आहे. जालना बाजारात गुळाच्या दरामध्ये 300 ते 400 रुपये प्रतिक्विंटल वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच गुळाची आवक कमी असल्याने दर वधारल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितला आहे. पाहुयात जालना बाजारात गुळाच्या दराची स्थिती कशी आहे.
advertisement
जालना शहरातील गूळ बाजारपेठ मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. लातूरनंतर जालन्यातील बाजारपेठ सर्वात मोठी आहे. जालना बाजारात लातूर, बीड आणि जालन्यातील गूळ दाखल होत आहे. त्याचबरोबर गुळाची आवक कमी असल्याने मध्यप्रदेशातूनही गूळ येत असल्याचे व्यापारी पुसाराम मुंदडा यांनी सांगितलं.
जालना शहरातील बाजारात दररोज 2000 ते 3000 भेली गूळ येत आहे. तर बाजारपेठ निमलाल पिवळा आणि हिरवा अशा प्रकारचा गूळ येत आहे. त्याचबरोबर लातूर येथील गावरानगूळ देखील येत आहे. गावरान गुळाला सर्वसामान्य ग्राहकांमधून सर्वाधिक मागणी आहे. आज आलेल्या गावरान गुळाला बाजारात 3900 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाल्याचे व्यापारी पुसाराम मुंदडा त्यांनी सांगितलं.
पंधरा दिवसांनी आधी गूळ बाजारात गुळाचे दर 2800 प्रतिक्विंटल ते 3500 प्रतिक्विंटल असे होते तर आता गुळाला 3000 ते 4000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. आगामी काळात गुळाचे दर गुळाच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकते, अशी शक्यता देखील व्यापार यांनी व्यक्त केली आहे. वाढलेली थंडी थंडीमुळे सर्वसामान्य ग्राहकांमधून गुळाला वाढलेली मागणी तसेच मकर संक्रांती हा सण ही गुळाच्या दरवाढीमागील कारणे असल्यास व्यापाऱ्यांनी सांगितलं.





