दिसायला हे अंडं काळपट असतं आणि त्याच्या पोषणमूल्यांबद्दल अनेक दावे केले जातात जसं की, हे अंडं प्रोटीनमध्ये जास्त, फॅटमध्ये कमी आणि इम्युनिटी वाढवणारं आहे. पण खरंच का हे अंडं पांढऱ्या किंवा तपकिरी अंड्यांपेक्षा वेगळं आहे? चला जाणून घेऊ या “काळ्या अंड्याचं” सत्य.
कडकनाथ म्हणजे नेमकं काय?
काळं अंडं म्हणजे कडकनाथ नावाच्या भारतीय जातीच्या कोंबडीचं अंडं. मध्य प्रदेशातील झाबुआ या आदिवासी भागात ही खास जाती आढळते. या कोंबडीचे पिसे, त्वचा, मांस आणि अंडी सगळंच काळसर असतं. याच वैशिष्ट्यामुळे तिला “ब्लॅक चिकन” म्हणूनही ओळखलं जातं. कडकनाथ अंडी चवीला स्वादिष्ट, प्रोटीनमध्ये श्रीमंत आणि फॅटमध्ये कमी असल्यामुळे हेल्थ कॉन्शस लोकांना ही अंडी फार आवडतात.
advertisement
साध्या अंड्यांच्या तुलनेत कडकनाथ अंडी प्रोटीनने जवळजवळ दुप्पट भरलेली असतात. 100 ग्रॅम कडकनाथ अंड्यांमध्ये सुमारे 15.6 ग्रॅम प्रोटीन असतं, तर सामान्य अंड्यात सुमारे 6–7 ग्रॅम. त्यात फॅट फक्त 1 ग्रॅम आणि कोलेस्ट्रॉल सुमारे 180 मिग्रॅ, जे सामान्य अंड्यांपेक्षा बरेच कमी आहे. त्यामुळे जिम करणारे, मसल्स वाढवू इच्छिणारे किंवा वजन नियंत्रणात ठेवू पाहणाऱ्यांसाठी हे अंडं उत्तम पर्याय ठरू शकतं.
आरोग्यासाठी फायदेशीर का?
कडकनाथ अंडं केवळ प्रोटीनने नव्हे, तर व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अमिनो अॅसिड्सने सुद्धा भरलेलं असतं.
हे अंडं इम्युनिटी वाढवतं, म्हणजे शरीराला आजारांपासून लढायला ताकद मिळते.
यातील कमी कोलेस्ट्रॉल आणि फॅट हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतात.
हे डायजेशन सुधारतं आणि शरीराला पोषक घटक सहज शोषायला मदत करतं.
यात असलेला ग्लूटॅमिक ऍसिड अंड्याच्या चवीत वेगळाच टवटवीतपणा आणतो.
काळं की पांढरं कोणतं चांगलं?
दोन्ही प्रकारची अंडी शरीरासाठी फायदेशीर आहेत, पण जर पोषणाच्या दर्जाची तुलना केली, तर कडकनाथ अंडं नक्कीच थोडं पुढे आहे. यात प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स जास्त असल्यामुळे शरीर मजबूत आणि त्वचा हेल्दी राहते. मात्र, या अंड्यांची किंमत सामान्य अंड्यांपेक्षा जास्त असते आणि ती प्रत्येक ठिकाणी सहज मिळत नाहीत.
म्हणून जर तुम्ही हेल्थ-फोकस्ड असाल आणि विशेष डाएट फॉलो करत असाल, तर कडकनाथ अंडी एक उत्तम पर्याय आहेत. पण दैनंदिन वापरासाठी पांढरी किंवा तपकिरी अंडीही तितकीच पौष्टिक आणि उपयोगी ठरतात.
