TRENDING:

Weight Loss : रात्री जेवल्यानंतर 'या' 3 गोष्टी आवर्जून करा; नक्की कमी होईल वजन

Last Updated:

अनेक जण डाएट, वर्कआउट आणि जिम यावर लक्ष केंद्रित करतात. पण वेट लॉस म्हणजे फक्त डाएट किंवा एक्सरसाइज इतकंच नाही, तर ही एक लाइफस्टाइल आहे. विशेषतः रात्रीचं जेवण झाल्यानंतरचे काही छोटेसे बदल तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला खूपच सोपं करू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोक वजन वाढीच्या समस्येनं ग्रस्त आहेत. अशावेळी काय करावं आणि कसं करावं? हे अनेकांना कळत नाही. त्यात महिला या त्रासानं पुरुषांपेक्षा जास्त ग्रासलेल्या आहेत. यामुळे त्या रोज इंटरनेटवर वजन कमी करण्यासाठी नवनवे उपाय शोधत असतात.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

अनेक जण डाएट, वर्कआउट आणि जिम यावर लक्ष केंद्रित करतात. पण वेट लॉस म्हणजे फक्त डाएट किंवा एक्सरसाइज इतकंच नाही, तर ही एक लाइफस्टाइल आहे. विशेषतः रात्रीचं जेवण झाल्यानंतरचे काही छोटेसे बदल तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला खूपच सोपं करू शकतात.

चला तर पाहूया, रात्रीचं जेवण झाल्यानंतर कोणत्या 3 सवयी तुमचं वजन कमी करण्यात मोलाची भूमिका निभावू शकतात.

advertisement

1. जेवणानंतर थोडं चालणं ठेवा

रात्रीचं जेवण झाल्यावर लगेचच झोपण्याऐवजी, थोडं चालणं केलंत तर शरीरातील मेटाबॉलिज्म सुधारतो आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं. International Journal of General Medicine मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, जेवणानंतर हलकंफुलकं वॉक केल्याने शरीरातील ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढत नाही.

जेवणानंतर साधारण 15–20 मिनिटं घरात किंवा गच्चीवर फिरल्याने शरीरात जास्त इन्सुलिन तयार होत नाही आणि त्यामुळे चरबी साठण्याची शक्यता कमी होते. या सवयीने तुमचं वजन हळूहळू पण नक्कीच कमी होईल.

advertisement

2. हर्बल टी किंवा ग्रीन टीचं सेवन करा

जेवणानंतर एखादी उबदार हर्बल टी म्हणजे ग्रीन टी, लिंबूपाणी, आलं-लवंग-तुळस घालून केलेलं पाणी पिणं पचनासाठी फायदेशीर ठरतं. ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातल्या चरबीला वितळवण्याचं काम करतात आणि झोपेत असतानाही काही प्रमाणात कॅलोरी बर्न होतात.

यामुळं ब्लोटिंग, गॅस, पोटदुखी कमी होते आणि रात्रभर शरीर चांगल्या रीतीने डिटॉक्स होतं. याचा परिणाम थेट वेट लॉसवर होतो.

advertisement

3. 8 तासांची झोप ही ‘मस्ट’

रात्री वेळेवर आणि शांत झोप मिळणं हे वजन कमी करण्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे जितकं डाएट आणि वर्कआउट. झोप पूर्ण न झाल्यास ‘घ्रेलिन’ नावाचं हार्मोन आपली भूक वाढवतं, तर ‘लेप्टिन’ योग्य प्रमाणात कार्य करत नाही. परिणामी तुम्हाला सारखी भूक लागल्यासारखं वाटतं आणि तुम्ही अनावश्यक खाण्याकडे वळता.

advertisement

अशा वेळी लेट नाईट स्नॅक्स वाढतात आणि वजनही हळूहळू वाढतं. एका अभ्यासात असंही दिसून आलं की, जे लोक दररोज फक्त 5 तास झोपतात त्यांचं वजन वाढण्याचा धोका 7–8 तास झोपणाऱ्यांपेक्षा अधिक असतो.

शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा...

वजन कमी करणं ही एक मोठी लढाई नाही. फक्त तुमच्या रोजच्या सवयी जरा सुधारण्याची गरज आहे. रात्रीचं जेवण वेळेवर करा, जेवणानंतर थोडं चालणं, गरम हर्बल टी आणि शांत झोप एवढं केलंत तरीही 15 दिवसांत सकारात्मक बदल दिसेल.

(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टीकरत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Loss : रात्री जेवल्यानंतर 'या' 3 गोष्टी आवर्जून करा; नक्की कमी होईल वजन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल