पावसाच्या पाण्याचा अनोखा असा वापर एका महिलेने दाखवला आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण दुधात पावसाच्या पाण्याचे काही थेंब टाकले तर त्या दुधाचं दही होतं. पावसाच्या पाण्याने दुधाचं दही बनतं, हे वाचूनच अनेकांना याचं आश्चर्य वाटलं असेल. कारण घरात दही बनवायचं असेल तर आपण सामान्यपणे दुधाला दह्याचं विरजण लावतो. ज्यामुळे दुधाचं दाटसर असं दही होतं. पण पावसाच्या पाण्याने दही कसं बनतं, हे एका महिलेनं दाखवलं आहे.
advertisement
Jugaad Video : पावसात प्लॅस्टिक भांड्यांना भोकं पाडा; दिसेल 'जादुई' परिणाम
नेमकं काय करायचं?
एका महिलेने हा प्रयोग करून पाहिला आणि त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओत महिला आधी एका भांड्यात पावसाचं पाणी जमा करते. त्यानंतर तिनं कपभर कोमट दूध घेतलं आहे. या दुधात एक-दोन चमचे हे पाणी टाकलं आणि ढवळून झाकून ठेवलं. 12 तासांनंतर महिलेने ते भांड उघडून पाहिलं तर काय दुधाचं चक्क दही झालं. तसं एरवी जसं दही असतं तसंच जाड तशाच वासाचं आणि चवीचं हे दही बनलं आहे असं या महिलेनं सांगितलं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
हस्तनक्षत्रातल्या पावसाच्या पाण्याने लागतं दुधाला विरजण
आता तुम्हीसुद्धा हा प्रयोग करून पाहणार असाल तर आधी थांबा. कारण हा चमत्कार तुम्हाला दररोजच्या पावसात नाही तर एका विशिष्ट दिवशी पडणाऱ्या पावसातच पाहायला मिळेल. हा पाऊस आहे हस्तनक्षत्रातला पाऊस. महिलेने सांगिल्यानुसार गरूडपुराणात याचा उल्लेखआ आहे. त्यानुसार 13 जुलैला हस्तनक्षत्र होतं तेव्हा महिलेने हा प्रयोग करून पाहिला. आता 9 ऑगस्ट, 6 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर यादिवशी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने दुधाला विरजण लावता येईल. त्यामुळे यादिवशी तुम्ही पावसाच्या पाण्याचं विरजण लावून दुधापासून दही बनवण्याचा प्रयोग करून पाहू शकता आणि त्याचा परिणाम काय आहे, हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Jugaad Video : पावसात अगरबत्तीचा रिकामा बॉक्स मोठा कामाचा; कुणालाच माहिती नसेल हा जुगाड
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)