Jugaad Video : पावसात अगरबत्तीचा रिकामा बॉक्स मोठा कामाचा; कुणालाच माहिती नसेल हा जुगाड
- Published by:Priya Lad
Last Updated:
अगरबत्तीच्या रिकामा बॉक्सचा अनोखा असा वापर एका महिलेने दाखवला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकदा का तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर त्यानंतर चुकूनही अगरबत्तीचा बॉक्स फेकणार नाही.
नवी दिल्ली : दररोज सकाळ-संध्याकाळ आपण देवासमोर अगरबत्ती लावतोच. पुठ्ठ्याच्या बॉक्समधील अगरबत्ती त्या बॉक्समध्येच ठेवून वापरतो किंवा दुसर्या घरात असलेल्या अगरबत्तीच्या प्लॅस्टिक बॉक्समध्ये ठेवतो. अगरबत्तीचा बॉक्स रिकामा झाला की तो फेकून देतो. पण अगरबत्तीचा हा रिकामा बॉक्स इतका कामाचा आहे की तुम्ही विचारही केला नसेल. पावसात तर याचा मोठा फायदा आहे.
अगरबत्तीच्या रिकामा बॉक्सचा अनोखा असा वापर एका महिलेने दाखवला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकदा का तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर त्यानंतर चुकूनही अगरबत्तीचा बॉक्स फेकणार नाही. आता अगरबत्तीच्या रिकाम्या बॉक्सचा असा काय फायदा आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
अगरबत्तीच्या रिकामा बॉक्सचं करायचं काय?
अगरबत्तीचा रिकामा बॉक्स घ्यायचा आणि त्याला मध्ये फक्त एक कट मारायचा. म्हणजे या बॉक्सचे तुम्हाला 2 किंवा 3 तुकडे करायचे आहेत. ते नीट दुमडून तुम्हाला कपाटात ठेवायचे आहेत. कपाटातील एका कोपर्यात हा बॉक्स ठेवा. जो वर्षभरही तुम्ही तिथेच ठेवू शकता, जो बिलकुल खराब होणार नाही. असं महिलेने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
advertisement
पावसात याचा फायदा काय?
पावसाळ्यात बर्याच समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे ओलाव्यामुळे येणारा कुबट वास. अगदी बंद कपाट उघडलं तरी त्यातून असा कुबट वास येतो. पण जर का अगरबत्तीचा रिकामा बॉक्स तुम्ही कपाटात ठेवलात तर कुबट वास नाही तर अगरबत्तीचा सुगंध येईल. कारण अगरबत्तीच्या बॉक्सला अगरबत्तीचा सुगंध असतो. तुम्ही हा बॉक्स बेडखालीसुद्धा ठेवू शकता. म्हणजे बेडलाही वास येणार नाही.
advertisement
इथं पाहा व्हिडिओ
यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
(सूचना : हा लेख सोशल मीडिया वरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18 मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. )
Location :
Delhi
First Published :
July 27, 2024 3:13 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Jugaad Video : पावसात अगरबत्तीचा रिकामा बॉक्स मोठा कामाचा; कुणालाच माहिती नसेल हा जुगाड