Jugaad Video : पावसात प्लॅस्टिक भांड्यांना भोकं पाडा; दिसेल 'जादुई' परिणाम

Last Updated:

छोट्या छोट्या प्लॅस्टिक भांड्यांचा पावसात इतका मोठा फायदा आहे की तुम्ही विचारही केला नसेल. या प्लॅस्टिक भांड्यांचा पावसात अनोख्या अशा वापराचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल होतो आहे.

फोटो : व्हिडीओ ग्रॅब
फोटो : व्हिडीओ ग्रॅब
मुंबई : आपल्या प्रत्येकाच्या घरात प्लॅस्टिक भांडी असतातच. एखादं फूड ऑर्डर केलं की त्याचे डबे, श्रीखंडाचे डबे, लोणच्याची बरणी असं काही ना काही छोटं प्लॅस्टिक कंटेनर असतंच. सामान्यपणे काही जण सुकं काहीतरी ठेवण्यासाठी याचा वापर करतात तर काही जण फेकून देतात. पण या कंटेनरचा पावसात इतका मोठा फायदा आहे की तुम्ही विचारही केला नसेल. या प्लॅस्टिक भांड्यांचा पावसात अनोख्या अशा वापराचा जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल होतो आहे.
तसं तुम्ही प्लॅस्टिकची मोठी भांडी पावसाचं पाणी साठवण्यासाठी वापरत असाल. पण छोट्या छोट्या भांड्याचाही तुम्हाला पावसात वापर करता येऊ शकतो.  पावसात बऱ्याच समस्या असतात. यापैकी तुमची एक समस्या घरातील याच छोट्या प्लॅस्टिक भांड्यामुळेच दूर होईल. प्लॅस्टिक भांडी इतकी कामाची असू शकतात, असंच तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणाल. यासाठी तुम्हाला फक्त भांड्यांना भोकं पाडायची आहेत.
advertisement
नेमकं करायचं काय?
प्लॅस्टिक कंटनेर घ्या. डबा असेल तर त्यावर झाकण असतं. या झाकणाला भोकं पाडा. एखादी टोकदार वस्तू किंवा काट्याचा चमचा घेऊन तो गॅसवर थोडा गरम करून त्याच्या मदतीनं झाकणाला छिद्र पाडा. एखाद्या भांड्याला झाकण नसेल त्याचं तोंड लहान असेल तर खाली थोडी जागा राहिल असं लक्षात घेऊन बाजूने छिद्र करा. जसं या व्हिडीओत दाखवलं आहे.
advertisement
आता या भांड्यात मीठ टाका, डिश वॉश डिटर्जंट किंवा कोणतंही लिक्विड डिटर्जंट टाका. हे मिठात मिक्स करा किंवा तसंच ठेवलं तरी काही हरकत नाही. आता यात फिनाईलच्या गोळ्या टाका. झाकण बंद करून हा डबा घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्या.
advertisement
याचा फायदा काय?
पावसाळ्यातील समस्यांपैकी एक म्हणजे घरात माश्या येणं. एरवी कधीच न दिसणाऱ्या माश्या पावसात मात्र मोठ्या प्रमाणात दिसून येतात. घराबाहेरच नव्हे तर घरातही माशा फिरताना दिसतात. कितीही स्वच्छता ठेवा तरी या माश्या येतातच. याच माश्यांपासून हा जुगाड सुटका देईल. डब्यातील मिश्रणाच्या वासामुळे घरातील माश्या लगेच पळून जातील आणि एकही माशी घरात घुसणार नाही.
advertisement
इथं पाहा व्हिडीओ
Maa, yeh kaise karun? युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना : या लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची खातरजमा करत नाही.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Jugaad Video : पावसात प्लॅस्टिक भांड्यांना भोकं पाडा; दिसेल 'जादुई' परिणाम
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement