Jugaad Video : पावसाळ्यात झाडूला कांदा जरूर लावा; मोठा फायदा
- Published by:Priya Lad
Last Updated:
झाडूवर कांदा लावताच अशी कमाल झाली की तुम्ही विचारही केला नसेल. एकदा हा जुगाड तुम्ही पाहाल तर तुम्हीसुद्धा कराल.
नवी दिल्ली : कांदा सामान्यपणे आपण स्वयंपाकात वापरतो. पदार्थांमध्ये फोडणीत कांदा पडतोच पण कांद्यापासूनही बरेच पदार्थ बनवले जातात. याशिवाय कांद्याचा वापर केसांच्या समस्येवरही होतो. कांद्यापासून बनवलेले तेल आणि शॅम्पूही आहेत. पण याशिवाय कांद्याचा आणखी एक अनोखा वापर एका गृहिणीने दाखवला आहे. या किचन जुगाड चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
कांद्याचा वापर झाडूवर करण्यात आला आहे. वाचून विचित्र वाटेल पण झाडूला कांदा लावताच कमाल झाली आहे. झा़डूवर कांदा लावल्यानंतर त्याचा असा परिणाम की एकदा हा व्हिडीओ तुम्ही पाहाल तर तुम्हीसुद्धा हा उपाय कराल.
नेमकं करायचं काय?
गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यात कांदे सालीसकट कापून टाका. यात आता थोडं व्हिनेगर टाका. पाणी थोडं आटेपर्यंत आणि पाण्याचा रंग बदलेपर्यंत ढवळत राहा. आता हे पाणी थंड करून एका बाटलीत भरा.
advertisement
याचा वापर कसा करायचा?
आता याचा वापर काय आणि कसा करायचा ते पाहुयात. झाडूवर मोजे टाका त्यावर बाटलीत तयार करून ठेवलेलं पाणी लावून घ्या. आता कांद्याचं पाणी टाकून मोजा लावलेला झाडू घरातील कानाकोपऱ्यात फिरवा.
याचा फायदा काय?
झाडूवर मोजे टाका त्यावर बाटलीत तयार करून ठेवलेलं पाणी लावून घ्या. आता कांद्याचं पाणी टाकून मोजा लावलेला झाडू घरातील कानाकोपऱ्यात फिरवा. यामुळे कीडे-किटक दूर राहतील. याच्या वासाने झुरळ, मुंग्या, पाल दूर राहतात. हा वास त्यांना सहन होत नाही
advertisement
इथं पाहा व्हिडिओ
Avika Rawat Food युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
Location :
Delhi
First Published :
July 26, 2024 2:17 PM IST