TRENDING:

Himalayan Fig Benefits: हिमालयात मिळणारं ‘हे’ फळ आहे आगळं वेगळं, एकदा खाल्ल्याने होतील अनेक फायदे

Last Updated:

Health Benefits of Himalayan Fig in Marathi: अंजीर हे दक्षिण आणि पश्चिम आशिया आणि भूमध्य प्रदेशतलं एक महत्वाचं फळ आहे. मात्र आता भारतातही अनेक ठिकाणी अंजीर फळाचं उत्पादन घेतलं जातं. मात्र देशात इतर ठिकाणी पिकणाऱ्या अंजीरापेक्षा हिमालयात पिकणारं अंजीर हे अधिक फायद्याचं आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानलं जातं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अंजीर हे फळ आणि सुकामेवा म्हणूनही खाता येतं. अंजीरात असलेल्या अनेक औषधी गुणधर्मांमुळे अनेक आजारांवर अंजीर खाणं हे फायद्याचं ठरू शकतं. अंजीर हे दक्षिण आणि पश्चिम आशिया,  भूमध्य प्रदेशतलं एक महत्वाचं फळ आहे. मात्र आता भारतातही अनेक ठिकाणी अंजीर फळाचं उत्पादन घेतलं जातं. मात्र देशात इतर ठिकाणी पिकणाऱ्या अंजीरापेक्षा हिमालयात पिकणारं अंजीर हे अधिक फायद्याचं आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानलं जातं. हिमालयीन अंजीर हे खनिजं आणि जीवनसत्त्वांचा खजीना आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा या हिमालयीन अंजीराचं कौतुक शक्तीशाली फळ असं केलं आहे. पंतप्रधान म्हणतात की, ‘ हिमालयीन अंजीरमध्ये अद्भुत शक्ती आहे. हिमालयीन अंजीर हे एक नैसर्गिक वेदनाशामक आहे.’ अनेक लोकं फक्त फळ किंवा सुकामेवा म्हणूनच नाही तर चटणी, लोणचं, जाम, इत्यादी स्वरूपातही ते खातात.
News18
News18
advertisement

हे सुद्धा वाचा : Fig Benefits : अंजीर खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे, अनेक आजार पळतील दूर

जाणून घेऊयात हिमालयीन अंजीर खाण्याचे फायदे

advertisement

हिमालयीन अंजिराला उत्तराखंडमध्ये बेदू नावाने ओळखलं जातं. पंजाबच्या लवली विद्यापीठ आणि अनेक परदेशी विद्यापीठांनी आत्तापर्यंत अंजिरावर अनेकदा संशोधन केलं आहे. अनेक संधोधनातून अंजीराचे आरोग्यदायी गुणधर्म अनेकदा सिद्ध झाले आहेत. अंजिरात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी २, व्हिटॅमिन सी, फायबर, कार्बोहायड्रेट असतात. अंजीर खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचनाच्या समस्यापासून सुटका होते. अंजीर खाल्ल्यामुळे आतड्यांमधील घाण निघून पोट आतून साफ व्हायला मदत होते. ब्लडप्रेशर, डायबिटीस सारख्या गंभीर आजारांवर अंजीर खाणं फायद्याचं ठरतं. अंजीर खाल्ल्यामुळे रक्तातल्या वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होऊन हृदयविकारांचा धोका टळतो. याशिवाय अंजीरमुळे इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अंजीर खाणं खूप फायदेशीर ठरतं. हिमालयीन अंजीर बुरशीजन्य संसर्गापासून ते ट्यूमर आणि अल्सरच्या गंभीर आजारांवर देखील गुणकारी ठरू शकतं.

advertisement

हे सुद्धा वाचा : Health Benefits of Fig: 7 दिवस खा फक्त 2 अंजीर; होतील ‘इतके’ फायदे, दूर पळतील अनेक आजार

advertisement

नैसर्गिक वेदनाशामक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की, हिमालयीन अंजिरामध्ये  दाहकविरोधी गुणधर्म आढळून येतात. लवली विद्यापीठानं केलेल्या संशोधनात असं आढळून आलंय की हिमालयीन अंजीरमध्ये सोरोलिन आणि रुटिन ही दो प्रमुख संयुगं आढळून येतात. सोरालेन सायक्लोऑक्सिजेनेज-2 या वेदना निर्माण करणाऱ्या एंझाइमला ब्लॉक करतं. या त्यामुळे ते नैसर्गिक वेदनाशमक म्हणून उत्तम काम करतं. हिमालयीन अंजीर हे अ‍ॅस्पिरिन किंवा डायक्लोफेनाक सारख्या औषधांना एक चांगला नैसर्गिक पर्याय ठरू शकतं. अनेक अभ्यासातून असंही आढळून आलं आहे की, विविध त्वचारोग आणि जखमांवर सुद्धा अंजीर फायद्याचं ठरतं.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Himalayan Fig Benefits: हिमालयात मिळणारं ‘हे’ फळ आहे आगळं वेगळं, एकदा खाल्ल्याने होतील अनेक फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल