Health Benefits of Fig: 7 दिवस खा फक्त 2 अंजीर; होतील ‘इतके’ फायदे, दूर पळतील अनेक आजार

Last Updated:

Health benefits of fig in Marathi: अंजीर हे एक असं फळ आहे जे ताजं आणि सुकवून दोन्ही पद्धतीने खाता येतं. ओल्या अंजीरात व्हिटॅमीन ए जास्त प्रमाणात असतं तर सुकवलेल्या अंजिरात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सल्फर भरपूर प्रमाणात आढळून येतात. दररोज अंजीर खाणं आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतं.

प्रतिकात्मक फोटो : फक्त 7 दिवस खा अंजीर; दूर पळतील अनेक आजार
प्रतिकात्मक फोटो : फक्त 7 दिवस खा अंजीर; दूर पळतील अनेक आजार
Health Benefits of Fig: अंजीर हे एक असं फळ आहे जे ताजं आणि सुकवून दोन्ही पद्धतीने खाता येतं. ओल्या अंजीरात व्हिटॅमीन ए जास्त प्रमाणात असतं तर सुकवलेल्या अंजिरात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सल्फर भरपूर प्रमाणात आढळून येतात. दररोज अंजीर खाणं आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतं. पाहुयात अंजीर खाण्याचे फायदे.
अंजीर हे एक असं फळ आहे जे ताजं आणि सुकवून दोन्ही पद्धतीने खाता येतं. ओल्या अंजीरात व्हिटॅमीन ए जास्त प्रमाणात असतं तर सुकवलेल्या अंजिरात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सल्फर भरपूर प्रमाणात आढळून येतात. दररोज अंजीर खाणं आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतं. पाहुयात अंजीर खाण्याचे फायदे.

अंजीर खाण्याचे फायदे (Health Benefits of Fig)

advertisement
1. बद्धकोष्ठता
बद्धकोष्ठतेवर अंजीर फार उपयोगी आहे. रोज 3 ते 4 अंजीर दुधात किंवा पाण्यात उकळून घ्या. उकळलेले अंजीर तुम्ही खा यानंतर ते पाणी पिऊन टाका. जर तुम्ही अंजीर दुधात उकळून घेतले असतील तर ते रात्री झोपण्यापूर्वी खा मग तेच दूध प्या. हे पोटदुखी आणि अपचन दूर करण्यास मदत करते. जर तुम्हाला अंजीर उकळून घ्यायचं नसेल तर 2 अंजीर रात्री पाण्यात भिजवून ठेवा तुम्ही ते खाऊ शकत.
advertisement
2. दमा
ज्यांना  दम्याचा त्रास आहे, खोकताना कफ पडतो त्यांच्यासाठी अंजीर खाणे खूफ फायद्याचं आहे. अंजीर कफ बाहेर काढायला मदत करतो त्यामुळे रूग्णाला सहज श्वास घेता येणं शक्य होतं. दुधात गरम करून सकाळी-संध्याकाळी खाल्ल्याने कफचे प्रमाण कमी होते, शरीरात नवीन ऊर्जा येते आणि दम्याचा रोग नष्ट होतो. पिकलेल्या अंजीराचा काढा प्यायल्याने खोकला संपतो.रोज सकाळी अंजीर आणि चिंच (जंगली जलेबी) एकत्र खाल्ल्यास श्वासरोग दूर व्हायला मदत होते. ज्यांना फुफ्फुसांचे आजार आहेत त्यांनी पाच अंजीर पाण्यात उकळून ते पाणी गाळून सकाळी-संध्याकाळी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
advertisement
3. दातदुखी आणि मुरूम
अंजीराच्या झाडापासून दूध काढून त्या दुधात कापूस भिजवून तो दुखऱ्या, किडलेल्या दातांखाली ठेवला तर दातांमधले किडे मरून जातात. त्यामुळे दातदुखीच्या समस्येपासून सुटका मिळते. कच्च्या अंजीराच्या दुधाचा वापर त्वचेशी संबंधित सर्व आजारांवर फायदेशीर आहे. अंजीराचे दूध लावल्याने (खाजणारी मुरुम) आणि पुरळ दूर होतात. सुकलेल्या अंजीराचा काढा बनवून प्यायल्याने घसा आणि जीभेचा आजारांपासून सुटका होते. जर हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल अंजीर भिजवून दिवसातून खाणं फायद्याचं आहे. यामुळे हिरड्यांमधून रक्त येणे थांबते आणि तोंडातून दुर्गंधी येणे थांबते.
advertisement
4. अशक्तपणा
पिकलेलं अंजीर बडीशेप बरोबर चघळून खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. सलग 40 दिवस अंजीर, बडीशेपचा नियमित वापर केल्याने शारीरिक अशक्तपणा दूर होतो. सुकं अंजीर आणि सोललेले बदाम गरम पाण्यात उकळून घ्या. त्यात साखर, वेलदोडा, केशर, पिस्ता सम प्रमाणात मिसळा. तयार झालेल्या मिश्रणामध्ये गायीचं तूप टाका. 8 दिवसानंतर रोज हे मिश्रण थोडं तुम्ही खा. लहान मुलांसाठी हे मिश्रण कोणत्या औषधापेक्षा कमी नाहीये.
advertisement
5. रक्तशुद्धी
10 मनुके आणि 5 अंजीर दुधात उकळून ते खा. त्यानंतर दूध प्या. यामुळे रक्तासंबंधीचे आजार कमी होतील. पिकलेल्या अंजिरात साखर घाला ते रात्रभर ठेवा. दररोज सकाळी 15 दिवस असं प्रकारचे अंजीर खाल्ल्याने शरीराची उष्णता दूर होते आणि रक्त वाढते.
6. कुष्ठरोग
कुष्ठरोगावर अंजीर बहुगुणकारी आहे. विविध पद्धतीने अंजीराच्या  वापर करून पांढरे डाग दूर करता येतात. अंजीराच्या झाडाची साल मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर वाटून घ्यावी. त्यात थोडं पाणी घालावं. तयार झालेल्या मिश्रणाच्या 4 पट तूप टाकून ते कढवून घ्यावं. तयार झालेलं मिश्रण थंड करून ते पांढऱ्या डागांवर लावल्यास पांढरे डाग नाहीसे होतात. कच्च्या अंजीरांच्या फळांपासून दूध सतत 4 महिने पांढऱ्या डागांवर लावल्याने हे डाग दूर होतात. याशिवाय अंजीराच्या पानांचा रस सकाळी आणि संध्याकाळी पांढऱ्या डागांवर लावल्याने फायदा होतो. लिंबाच्या रसात अंजीर वाटून पांढऱ्या डागांवर लावल्याने फायदा होतो.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Benefits of Fig: 7 दिवस खा फक्त 2 अंजीर; होतील ‘इतके’ फायदे, दूर पळतील अनेक आजार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement