Fig : अंजीर आहे पोषक घटकांचा खजिना, आहारात करा समावेश
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
अंजीर खाल्ल्यानं शरीराला कॅल्शियम मिळतं, त्यात अँटी-ऑक्सिडेंट असतात आणि ते दाहक-विरोधी गुणधर्मांचाही चांगला स्रोत आहे. त्यामुळे आहारात अंजिराचा समावेश नक्की करा.
मुंबई : सुका मेवा म्हणजे पोषक घटकांचा खजिना. शरीराला आवश्यक कॅल्शियमसाठी यातील काजू किंवा बदाम नाही अंजीर खाल्ल्याचा फायदा होतो. हाडं मजबूत ठेवण्यासाठी आणि शरीराच्या एकूण आरोग्यासाठी कॅल्शियमचं सेवन आवश्यक आहे.
कॅल्शियम या खनिजाची शरीराला अनेक कारणांसाठी गरज असते. कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात, त्यामुळे दातांनाही फायदा होतो, आणि स्नायू आणि नसांनाही फायदा होतो. असंच एक फायदेशीर ड्रायफ्रूट म्हणजे अंजीर. अंजीर खाल्ल्यानं शरीराला कॅल्शियम मिळते, त्यात अँटी-ऑक्सिडेंट असतात आणि ते दाहक-विरोधी गुणधर्मांचाही चांगला स्रोत आहे.
advertisement
हाडांना बळ मिळतं -
अंजीर हाडं मजबूत करण्यासाठी उत्तम ड्राय फ्रूट आहे. ते खाल्ल्यानं शरीराला कॅल्शियम तर मिळतंच शिवाय मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी खनिजं देखील मिळतात. यामुळे हाडं मजबूत होण्यात मदत होते. अंजीर खाल्ल्यानं हाडांचे आजारही दूर होऊ शकतात.
advertisement
वजन व्यवस्थापन -
वजन नियंत्रणासाठीही अंजीर खाऊ शकतो. शरीराच्या तंदुरुस्तीसाठी आणि वजन कमी करण्यासाठी अंजीर उपयुक्त आहे. यामुळे पचनसंस्थेलाही फायदा होतो आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे अंजीर खाल्ल्यानंतर वारंवार भूक लागत नाही.
advertisement
पचनक्रिया निरोगी राहते -
फायबर शरीरासाठी फायदेशीर आहे आणि विशेषतः पचन व्यवस्थित ठेवते. अशा परिस्थितीत फायबर युक्त
अंजीर खाल्ल्यानं पचनक्रियेला फायदा होतो. यामुळे अन्नाचं पचन व्यवस्थित होतं आणि शरीराला प्रोबायोटिक्स देखील मिळतात, ज्यामुळे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं.
शरीराला अँटी-ऑक्सिडंट्स मिळतात -
अँटी-ऑक्सिडंट्सच्या चांगल्या प्रमाणामुळे, अंजीर खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे शरीराला हानी पोहोचवणाऱ्या घटकांशी लढा देता येतो. अँटी-ऑक्सिडंट्सचा प्रभाव शरीरावर केवळ अंतर्गतच नाही तर बाहेरूनही दिसून येतो. त्यामुळे त्वचेचं आरोग्य चांगलं राहून त्वचेवर ग्लो दिसून येतो.
advertisement
रक्तातील साखरेचं व्यवस्थापन -
अंजीराची चव फार गोड नसते. तसंच, त्यात रक्तातील साखरेचं व्यवस्थापन करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे अंजीर खाल्ल्यानं रक्तातील साखर नियंत्रित राहू शकते म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2024 5:22 PM IST