Fig Benefits in Winter: हिवाळ्यात अंजीर खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे, अनेक आजार पळतील दूर

Last Updated:

Benefits of Fig in Marathi: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंजीर हे फायद्याचं मानलं जातं. अंजीरमध्ये फायबर्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.

प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात अंजीर खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे, अनेक आजार पळतील दूर
प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात अंजीर खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे, अनेक आजार पळतील दूर
मुंबई : हिवाळ्यात बदललेल्या वातावरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन अनेक संक्रामित आजारांचा धोका असतो. त्यामुळे अशा आजारांचा सामना करण्यासाठी  फिट राहणं गरजेचं असतं आणि फिट राहण्यासाठी आपसूकच गरजेचा असतो तो पौष्टिक आहार आणि फळं.  रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंजीर हे फायद्याचं मानलं जातं. अंजीरमध्ये फायबर्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय, अंजिरात असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे शरीराचं मुक्त रॅडिकल्सपासून बचाव होऊन हंगामी आजारांच्या संक्रमणाचा धोका टळतो.
Benefits of Fig in Marathi: हिवाळ्यात अंजीर खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे, अनेक आजार पळतील दूर

1) पचनक्रियेसाठी फायद्याचं :

हिवाळ्यात थंडीमुळे पचनक्रिया मंदावते. त्यातच शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी उष्ण प्रवृत्तीचे पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. या सगळ्याच्या परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होऊन पचनाचे विकार होण्याची भीती असते. या सगळ्यावर अंजीर हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. कारण अंजीरात असलेल्या फायबर्समुळे अन्न पचायला मदत होते. त्यामुळे आतड्यांवर ताण न आल्याने पचनसंस्था सुरळीत कार्यरत राहते.
advertisement

2) वजन कमी करण्यात फायदेशीर :

अंजीरमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असतात. या फायबर्समुळे अन्न पचायला मदत होतो. याशिवाय फायबर्समुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. त्यामुळे भूक लागत नाही आणि आपसूकच वजन नियंत्रणात राहायला मदत होते. अंजीर वजन कमी करण्यासोबतच शरीराला ऊर्जाही पुरवतं. त्यामुळे हिवाळ्यात अंजीर खाणं  हे फायद्याचं ठरतं.
advertisement

3) रोगप्रतिकारशक्ती  वाढते :

हिवाळ्यात संक्रामित आजारांचा धोका टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं गरजेचं आहे. अंजीरमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे  शरीरातली रोप्रतिकार शक्ती वाढायला मदत होते.

4) हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचं :

advertisement
अंजीरमध्ये असलेलं पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयावर ताण न नाही. अंजीर खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य सुधारून विविध हृदयविकारांचा धोका टाळता येतो.
Benefits of Fig in Marathi: हिवाळ्यात अंजीर खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे, अनेक आजार पळतील दूर

5) हाडं मजबूत होतात :

advertisement
हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. अंजीरमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असतं, जे हाडे मजबूत करण्यात मदत करतं. त्यामुळे हिवाळ्यात अंजीर खाल्ल्याने हाडांच्या दुखण्याचा त्रास कमी होऊ शकतो.

6) दंतविकारांवर गुणकारी :

अंजीराच्या झाडापासून दूध काढून त्या दुधात कापूस भिजवून तो दुखऱ्या, किडलेल्या दातांखाली ठेवला तर दातांमधले किडे मरून जातात. त्यामुळे दातदुखीच्या समस्येपासून सुटका मिळते. हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल अंजीर भिजवून दिवसातून खाणं फायद्याचं आहे. यामुळे हिरड्यांमधून रक्त येणे थांबते आणि तोंडातून दुर्गंधी येणे थांबते. सुकलेल्या अंजीराचा काढा बनवून प्यायल्याने घसा आणि जीभेचा आजारांपासून सुटका होते.
advertisement
आपण अंजीर खाण्याचे फायदे जरी पाहिले असले तरीही योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी अंजीर खाल्लं तर त्याचे फायदे द्विगुणीत होतात.

जाणून घेऊयात अंजीर खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ कोणती ते.

अंजीर खाण्याची योग्य पद्धत
दुधासोबत अंजीर खाणं:
थंडीत अंजीर गरम दुधासोबत अंजीर खाणं आरोग्यासाठी  फायदेशीर मानलं गेलंय. यामुळे शरीर आतून उबदार राहायला मदत होते.
advertisement

ड्रायफ्रुट्स सोबत:

ओलं अंजीर हे फळ तर सुकवलेलं अंजीर हा एक सुकामेवा मानला जातो. याच अंजीरसोबत बदाम, अक्रोड आणि मनुका खाल्ल्याने शरीराला विविध फायदे होतात.

Benefits of Fig in Marathi: हिवाळ्यात अंजीर खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे, अनेक आजार पळतील दूर

सकाळी रिकाम्या पोटी :

असं म्हटलं जातं की, सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी कोणत्या गोष्टीचं सेवन केलं तर त्याचे फायदे जास्त मिळतात. अंजीराचंही तसंत आहे. आदल्या दिवशी भिजवून ठेवलेले 2-3 सुके अंजीर दुसऱ्या दिवशी उपाशी पोटी खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्ती वाढायला मदत होते.

अंजीराचे आरोग्यदायी फायदे जरी असले तरीही अंजीराचा वापर योग्य त्या प्रमाणात करायला हवा. अन्यथा शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.

अतिप्रमाणात अंजीर खाण्याचे धोके.

Benefits of Fig in Marathi: हिवाळ्यात अंजीर खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे, अनेक आजार पळतील दूर
  • अंजीर हे फळ आणि चवीला गोड असल्याने त्यात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे अंजीराचं  मर्यादित प्रमाणात सेवन करणं फायद्याचं ठरतं.
  • डायबिटीस असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अंजीर खाऊ नये.
  • कच्च अंजीर खाण्यापेक्षा ते रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने अधिक फायद्याचं ठरतं.
अंजीराच्या इतक्या फायद्यांमुळे त्याला सुपरफूड म्हणणं चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे आजपासूनच तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करा आणि स्वत:ला निरोगी आणि स्वस्थ ठेवा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fig Benefits in Winter: हिवाळ्यात अंजीर खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे, अनेक आजार पळतील दूर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement